कोरोनामुळे मुंबईसह देश लॉकडाऊन भोगत आहे, अनेकांना या लॉकडाऊनची सवय झाली आहे तर अनेकजण लॉकडाऊन सुटण्याची वाट बघत आहेत. त्याच्यात अनेक कामगार, विद्यार्थी, कुटुंबासोबत आलेले नागरीक मुंबईतच अडकून आहेत, ज्यांना काहीही करून गावी जायाचं आहे. अशांसाठी रेल्वेने आपल्या दिवसाच्या काही फेऱ्या नियम आणि अटींच्या माध्यमातून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात तशाही श्रमिक स्पेशल ट्रेन सुरूच आहेत, मात्र या खास ट्रेन असणार आहेत, ज्या कोरोनाच्या आधीही प्रवाशांना सेवा पुरवत होत्या. या ट्रेनमध्ये सामान्यरित्या मेल/एक्सप्रेस, पॅसेंजर, सबर्बन रेल्वे असे प्रकार असणार आहेत, सोबतच एसी, नॉन एसी, जनरल असेदेखील प्रकार याच्यात असणार आहेत.

काय असतील यासाठी नियम...
  • या ट्रेनचे तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशाला IRCRC या वेबसाईटवरून ऑनलाईनरित्या बूक करावं लागणार आहे.
  • फक्त 30 दिवस आधी प्रवाशी आपलं तिकिट बूक करू शकतात.
  • प्रवासाच्या सुरूवातीला प्रवाशांचं स्क्रिनिंग होईल, काही लक्षण अढळ्यास संबंधीत प्रवाशाचा प्रवास रद्द करण्यात येईल
  • वेटिंग तिकीटही मिळेल, पण वेळेत कन्फर्म नाही झालं, तर प्रवास करता येणार नाही
  • सगळ्याच ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार नसेल, त्यामुळे प्रवाशांनी आपलं खाद्य सोबत आणावं.
  • ट्रेनमध्ये पडदे नसतील, तसेच चादर आणि पांघरुणही मिळणार नाही, त्यामुळे त्याप्रकारचे साहित्य स्वत: आणावे
  • प्रवाशांनी ट्रेनच्या 90 मिनिटे आधी येणे, बंधनकारक

कुठून कुठे जाणार ट्रेन
मुंबईहून सुटणाऱ्या
  • मुंबई ते भुवनेश्वर - कोणार्क एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते दरभंगा एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी - कामायनी एक्स्प्रेस
  • मुंबई CSMT ते वाराणसी - महानगरी एक्स्प्रेस
  • मुंबई CSMT ते गदग एक्स्प्रेस
  • मुंबई CSMT ते बंगळुरू - उद्यान एक्स्प्रेस
  • वांद्रे टर्मिनस ते जोधपूर - सूर्यनगरी एक्स्प्रेस
  • मुंबई CSMT ते हैदराबाद - हुसैनसागर एक्स्प्रेस
  • मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद - कर्णावती एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम - नेत्रावती एक्स्प्रेस
  • मुंबई सेंट्रल ते जयपूर एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटलीपुत्र एक्स्प्रेस
  • लोकमान्य टिळक टर्मिनस ते गुवाहाटी एक्स्प्रेस
  • वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर - अवध एक्स्प्रेस
  • वांद्रे टर्मिनस ते मुझ्झफरपूर - अवध एक्स्प्रेस
बाहेरून मुंबईत येणाऱ्या ट्रेन
  • लखनऊ ते मुंबई CSMT - पुष्पक एक्स्प्रेस
  • हावडा ते मुंबई CSMT मेल
  • अमृतसर ते मुंबई सेंट्रल - गोल्डन टेंपल मेल
  • अमृतसर ते वांद्रे टर्मिनस - पश्चिम एक्स्प्रेस
  • पटना ते LTT एक्स्प्रेस
  • गोरखपूर ते LTT एक्स्प्रेस

आपल्या सगळ्यांवर कोरोनाचे सावट आहे आणि दुसरीकडे खायचं काय, याचीही भिती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना स्वत:ची काळजी स्वत:चं घ्यावी लागेल. जितकं होईल तितकं सुरक्षित राहून आपली कामं सुरू करावी लागतील.

या लेखाव्यतिरिक्त अजून काही तुमचे प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि सोबतच अशेच काही वंटास लेख वाटण्यासाठी आमच्या वंटास मुंबईला रोज भेट द्या. 


हेही वाचाच...

काय होतं 1974 मध्ये 40 दिवस मुंबई लोकल बंद असण्याचं कारण