जगात लॉकडाऊन वाढला आहे. अनेक दिवस जग, देश आणि राज्य आहे त्या ठिकाणी ठप्प आहेत. कोणत्याही फॅक्टरी सुरू नाहीत, ना कोणती विना गरजेची वाहाने, प्रदुषणाचं कोणतही साधन आज घडीला सुरू नाही. त्यामुळे संपुर्ण जगातील प्रदुर्षणाचा थर कमी झाला आहे, त्यातल्या त्यात ओझोनच्या थरातले ब्लॅकहोलदेखील भरून निघाले आहेत. म्हणून आजचा जैवविविधता दिवस नक्कीच एका खऱ्या अर्थाने संपन्न होत आहे, असं म्हणायला हरकत नाही.
जैवविविधता या शब्दाचा असा झाला जन्म
रेमंड एफ दासमान यांनी 1968 साली A Different kind Of Country नावाचं एक पुस्तक लिहलं होतं, ज्यामध्ये सर्वप्रथम जैवविविधता या शब्दाचा प्रयोग करण्यात आला होता. त्यानंतर 1980 मध्ये संपुर्ण जगामध्ये पर्यावरण कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला, त्यावेळी या शब्दाचा प्रयोग खूप मोठ्याप्रमाणात करण्यात आला होता. तेव्हापासून जैवविवधता हा शब्दप्रयोग सामान्यरित्या करण्यात येऊ लागला. तसेच मधल्या काळात पर्यावरणाच्या संतुलनाबद्दल बोलण्यासाठी ‘नॅचरल डायव्हर्सिटी-नैसर्गिक विविधता’ असा शब्दप्रयोग करण्यात येत असे.
आज जैवविविधता दिवसाचे औचित्य साधून वंटास मुंबई मुंबईतील जैवविविधतेची खास खबर आपल्या वाचकांससाठी घेऊन आली आहे. सध्या जगातल्या 250 हून अधीक देशांमध्ये लॉकडॉऊन पाळला जात आहे, त्यामुळे या संपुर्ण देशात बिघडत चाललेली जैवविविधतेची परिस्थिती रुळावर येत आहे, असे म्हटले जाते. भारतातील मुंबईत देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वत्र टाळेबंदी झाली आणि रस्त्यांवरील वाहनांची रहदारी कमी झाली. उद्योगांना ‘वर्क फ्रॉम होम’ची सूचना देण्यात आल्याने त्याचा सकारात्मक परिणाम हवामान व पर्यावरणावर झाला आहे. वाहने आणि उद्योग बंद असल्याने मुंबई शहरातील प्रदूषण कमी झालं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मागच्या आठ दिवसांत ऑक्साईट ऑफ नायट्रोजनचे 57% आणि हवेतील पीएम 2.5% चे प्रमाण 53% टक्क्यांनी कमी झाले आहे.
काय सांगतात पर्यावरण तज्ज्ञ अभिजित घोरपडे
"आपल्याकडे मानवनिर्मित घटकांमुळे प्रदूषण जास्त होते. सध्या रस्त्यांवर वाहने नसल्यानं स्वाभाविकपणे प्रदूषण कमी होत आहे. त्यामुळे वाहने आणि औद्योगिक गोष्टींमुळे प्रदूषण कमी होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्योगांची उर्जा वापरण्याची कार्यक्षमता वाढवून त्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने नियोजन आणि उपाययोजना केल्या, तर प्रदूषण कमी करता येऊ शकेल."
जगाच्या पाठीवर जैवविविधतेची खबर
झपाट्याने होणाऱ्या बदलांमुळे परिसरातील अनेक सजीव नकळत लुप्त होत असतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव प्रजातींचा नाश झाल्याचे म्हटले जाते. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाल्याचे अनेक अभ्यास म्हणत असतात. सध्या जगभरात जैवविविधतेत वायुच्या शुद्धतेचा विचार केला तर ती, AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स ६६ नोंदवली आहे, मात्र मार्च २०१९ मध्ये हवा एक्यूआय १५३ होती.
जैवविविधतेत भारताचा कितवा नंबर
जागतीक स्तरावर भारत हा त्या दहा देशांमध्ये गनला जातो, जो सर्वाधिक जैवविविधता राखून आहे. जैवविविधता जपण्यामध्ये भारताचा उच्च देशांमध्ये चौथा क्रमांक लागतो. पाहुयात अनेक देशांची सविस्तर जैवविविधतेची आकडेवारी...
1. रुस - 8.7
2. चीन - 6.2
3. ऑस्ट्रेलिया - 5.8
4. भारत - 5.3
5. अमेरिका - 5.1
6. जपान - 4.6
7. पापुआ न्यु गिनि - 4.1
8. मेदागास्कर - 3.6
9. द. अफ्रीका - 3.4
10. ब्राझिल - 2.8
चला, लॉकडॉऊनमुळे आज पृथ्वीवरील जैवविविधतेचा समतोल राखण्यासाठी मदत होत आहे, जैवविविधतेचा नाश करणारे एकमेव कारण ते म्हणजे मोठ्या प्रमाणात होत असलेलं प्रदुषण! आता सगळे घरी असल्यामुळे त्यात बऱ्यापैकी घट झालेली आहे. वंटास मुंबईचा हा पॉजिटीव्ह रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. अशाच अनेक माहितींसाठी आमच्या सोशल मिडियाशी कनेक्ट राहा.


0 Comments