देशभरात सगळीकडे नुसता कोरोना, कोरोना आणि कोरोना. ह्या कोरोनाने लोकांना घरी बसविले आणि थोडीफार रुळावर येणारी अर्थव्यवस्था पण डोंगरावरून खाली पडणाऱ्या पाण्यासारखी खाली कोसळली. आता सरकारपुढे मोठं चॅलेंज आहे, ते म्हणजे कोरोनावर मात करणे आणि आपली अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणणे. आपले नागरिक आता उत्तमरित्या सरकारला साथ देताना दिसत आहेत, असं वंटास मुंबई थोड्याफार कमी होनाऱ्या आकडेवारीवरुन सांगत आहे.
नुकतेच शर्थीचे प्रयत्न करून सरकारने विचार पूर्वक एक सोल्युशन शोधून काढले आहे. राज्याचा पूर्ण आढावा घेत 3 झोन तयार केले आहेत. अर्थातच आता कोरोना सोबत अर्थव्यवस्थेचा प्रश्न उभा आहे आणि काहीतरी मार्ग काढणे गरजेचं आहे, नाहीतर अस होईल; की कोरोना तर जाईल पण घटत्या आर्थिक मंदीचे सावट आपल्यासमोर उभे राहिल. पाहुयात आता हे 3 झोन नक्की काय प्रकार आहे.
काय आहेत हे 3 वेगवेगळे झोन
अर्थव्यवस्थेची टांगती तलवार स्थिर करण्यासाठी, सरकारकडून कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची 3 झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कोरोना रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार 3 झोन करण्यात आले असून सर्व जिल्ह्यांमधील खबरदारीला घेऊन उपाययोजना करून उद्योग व व्यवहार सुरू करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. आजपासून या उपाययोजना सरकारच्या आदेशानुसार सुरू होतील.
त्यामधली ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील काही उपाययोजना करून येथील व्यवहार सुरू करता येऊ शकतात. त्यानुसार या झोनमधील जिल्ह्यांच्या सीमा सील करून तेथील उद्योग आणि व्यवहार सुरू करण्यावर चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना हाती येताच तसा निर्णय होऊ शकतो. जे उद्योग आपल्या कारखान्यात सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची हमी देतील, तेथे तशी व्यवस्था करतील आणि कामगारांची व्यवस्था कारखान्यातच करतील, असे उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचेही टोपे म्हणाले. मात्र, रेड झोनमधील जिल्ह्यांत ‘लॉकडाउन’ अधिक कडक करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे.
आता पाहू तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्येरेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली, औरंगाबादऑरेंज झोन : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोदियाग्रीन झोन : धुळे, नंदूरबार, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
आजपासून काय सेवा बंद राहणार
● सिनेमागृहं आणि मॉल्स, जिम, स्विमिंग पूल्स, थिएटर्स, स्पोर्ट्स सेंटर्स
● सामाजिक, धार्मिक, राजकीय, क्रीडा कार्यक्रम
● जिल्ह्यांतर्गत आणि राज्यांतर्गत प्रवासी रस्ते
● रेल्वे सेवा
● विमान वाहतूक
● रिक्षा किंवा टॅक्सी सर्व्हिस
● शाळा, महाविद्यालयं आणि सर्व शिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस
आजपासून काय सेवा चालू होणार
● जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करणारे ट्रक
● गॅरेजेस
● शेतीसंबंधीची सर्व कामं, खत आणि कीटकनाशकांची विक्री करणारी दुकानं
● मत्स्य व्यवसाय
● सिचन प्रकल्प, मनरेगाची कामं
● डिजिटल व्यवहार
● आयटी सेवा आणि कॉल सेंटर्स (50 टक्के कर्मचारी)
● कुरिअर सेवा
● ऑनलाईन शिक्षण
● सरकारी कार्यालये
● आरोग्य सेवा
● लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे हॉटेल्स, मोटेल्स अंडी क्वारंटाईन सेंटर्स
● इलेक्ट्रिशियन, प्लम्बर्स, मोटार मेकॅनिक्स, आयटी सुविधा देणारे कर्मचारी
वाचण्यासारखं वंटास...
सगळ्यांना घरपण देणारी मुंबईतर रेड झोनमध्ये येते; पण आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर आर्थिक राजधानी असणारी आपली मुंबई कशी रुळावर आणता येईल? यासाठी आपल्या सर्वांनाच मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत,एकिकडे "आर्थिक प्रश्न आणि दुसरीकडे कोरोनाचे उत्तर" हे दोघे एकत्र संसार नही करू शकत आणि मुंबईसारख्या शहरात तर नाहीच नाही. त्यामुळे काहीतरी मार्ग काढणे गरजेचे आहे, पण मुंबई सुरक्षित ठेवणेदेखील महत्वाचे आहे. असो, वंटास मुबंई म्हणते, जान है तो जहान.
सर्वदृष्ट्या संपन्न असलेली मुंबई सावरायला वेळ लागेल. मुंबईकरांनी संयम बाळगणे हेच आताच्या घडीला योग्य ठरेल.


1 Comments
खूप उत्कृषटरित्या माहितीचे विश्लेषण केले आहे. 👌👏
ReplyDelete