जितका कोरोना रुग्णांचा आकडा मुंबईत वाढत चालला आहे, तितकाच आकडा मुंबईतल्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आणि बऱ्या होणाऱ्या रुग्णांचादेखील आहे, असं म्हणायला हरकत नाही. अजूनपर्यंत वैद्यकिय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्यात 60 वर्षांच्या वरील अनेक महिला आणि पुरुषांना कोरोनाची लागण होण्याचे संकेत मोठ्याप्रमाणात असतात. मात्र आतापर्यंत ज्या अनेक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, त्यातील बहुतांश लोकांचं वय तर 60 च्या वर आहे.

कोरोनाची लागण होते कोणाला?
ज्या व्यक्तीकडे रोग प्रतिकारक क्षमता कमी आहे, अशा सगळ्यांनाच कोरोनाची लागण होते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, मात्र यासाठीदेखील काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत. 
तर त्या कोणत्या?
कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या शरिरावरील विषाणु आपल्या शरिरावर आल्यावर, नंतर ते नाकावाटे, तोंडावाटे आपल्या शरिरात गेल्यावर आपल्यात कोरोनाचे गुणधर्म दिसू लागतात. आता या सगळ्या पध्दतीला डॉक्टरांच्या मते 14 दिवसांपर्यंतचा कालावधी लागतो. म्हणजे कोरोना विषाणू आपल्या शरिरात गेल्यावर लगेचच आपलं काम सुरू करत नाही, तर आधी आपल्या शरिरात असलेल्या पांढऱ्या रक्तपेशी त्याच्याशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यात जर त्या अपयशी झाल्या तर मग आपल्या शरिरात कोरोनाची लागण होण्यास सुरूवात होते, सामान्यपणे वैधकिय अधिकारी अशाप्रकारे मत मांडत आहेत. 

आता पर्यंत पाहिलं तर मुंबईच्या धारावी सारख्या परिसरात 7 वर्षांपासून 70 वर्षांपर्यंत संपर्कात आलेल्या अनेकांना याची लागण होत आहे. वय, लिंग, दुसरा कोणता आजार असेल, शरिरातील प्रतिकारात्मक क्षमता किती आहे, लागण झाल्यावर त्याच्यावर होणारे उपचार अशा सगळ्या गोष्टींवर तो व्हायरस लागण होण्याची, टिकुण रााहण्याची, बरे होण्याची आणि मृत्यू होण्याची चिन्हे अवलंबुन असतात.
खोकला, ताप ही कोरोना व्हायरसची मुख्य लक्षणे त्यानंतर येतात शरिर दुखणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसून येतात. आता या सगळ्यावरून महत्वाच्या गोष्टीकडे वळू...
कोरोना संक्रमित 20 रुग्णांच्या पाठीवर 1 रुग्णाला जमल्यास व्हेंटिलरवर ठेवावे लागते, अशी माहिती WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेकडून देण्यात आली आणि जर एखाद्या रुग्णाला आयसीयूत दाखल करण्याची वेळ आलीच तर मात्र त्याला कोणताही आजार असला तरी त्या आजारातून बाहेर येण्यास काहीसा कालावधी त्या रुग्णाला लागतोच, आयसीयूमधून बाहेर आल्यावर रुग्णाला काही दिवस जनरल वार्डमध्ये शिफ्ट केले जाते, त्यामुळे कोरोना संक्रमित रुग्णालाही त्याचप्रकारे वेळ लागतो.

बीबीसी हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार फॅकल्टी ऑफ इंटेसिव्ह केअर मेडिसीनचे डीन डॉ. एलियन पिटार्ड यांच्या मते क्रिटीकल परिस्थितीतून जर एखादा पेशंट बरा होत असेल तरीदेखील त्याला पुर्णपणे बरे होण्यासाठी तब्बल 12 ते 18 महिन्यांचा कालावधी लागतो. तर कार्डिफ अँड वेले यूनिव्हर्सिटी हेल्थ बोर्डचे क्रिटिकल केअर फिजिओथेरेपिस्ट पॉल ट्वोज यांनीदेखील या आजारावर आपले मत मांडले आहे, त्यांच्या मते कोरोना संक्रमित रोगींमध्ये व्हायरल होणारा थकवा आढळून आला, सोबतच चीन आणि इटलीतल्या पेशंटच्या रिपोर्ट्समध्ये थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, एकसारखा लागणारा खोकला, श्वासोच्छश्वास घेण्यासाठी होणारा त्रास ही लक्षणे अढळून आलीत.

अनेक वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या मते एखादा रुग्ण आयसीयूमध्ये दाखल केला जातो, त्यावेळेस तो अनेक उपचारांमधून जात असतो, त्यामुळे रुग्णाला अनेक मानसिक त्रासांनादेखील सामोरे जावे लागते, या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी रुग्णांना अनेक दिवस लागतात, काहींनातर महिने लागतात, मात्र हे सगळ्यांनाच लागू होत नाही, हे सांगण्यासाठीदेखील डॉक्टर विसरले नाहीत.