जे पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये घडलं नाही ते कोरोनामुळे आज घडताना पाहात आहो. कोणासाठी व केव्हाही न थांबणारी आपली वंटास मुंबई चक्क या विषाणूचा बळी पडली. मुंबई लोकलच्या इतिहासात केव्हा नव्हे पहिल्यांदा लोकल एवढ्या दिवस थांबली. मुंबईत न होणाऱ्या गोष्टी या काळात होत आहेत. या सर्व गोष्टी आपण याची देही याची डोळा पाहात आहोतआणि या सगळ्याचे आपण साक्षीदार आहोत, हेही विसरु नका.
ज्या चीनने कोरोनाचा प्रसार केला त्यापेक्षा अमेरिका, इटली, इराण या देशांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला. सर्व देशांच्या तुलनेत भारत या विषाणूशी दोन हात करून चांगल्या प्रकारे लढताना दिसत आहे. आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत भारत कोरोनाला हारवण्यासाठी मैदानात कंबर कसून फलंदाजी करताना दिसत आहे. मात्र कोरोनाची गोलंदाजी अचूक आणि भेदक टप्प्याची आहे, यासमोर भारत कसून फलंदाजी करत असला तरी काही चेंडू भारताला दिवसाला तारे दाखवत आहेत, इतर देशांनी मैदानात उतरण्यागोदरच कोरोनाने त्रिफळाचीत केले आहे. विशेषतः अमेरिकेचा यामध्ये समावेश आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्या जरी 16 हजारांपेक्षा अधिक असली तरी ही बाब इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे, परंतु अभिमानाने सांगण्यासारखी नाही. इतर देशांनी कोरोनासमोर हतबल होऊन भारताकडे मदतीसाठी विनंती केली, यामध्ये बलाढ्य आणि शक्तीशाली समजला जाणारी अमेरिकेचासुद्धा समावेश आहे. ही बाब मात्र अभिमानस्पद आहे.
हेही वाचा : अनेक लिफ्टमध्ये आरसा का असतो?
हायड्रोक्सिक्लोरोक्विन’ (HCQ) या औषधाची कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर मोठ्या प्रमाणात इतर देशांकडून मागणी होत आहे. या औषधाचा कोरोनावर कमी अधिक प्रमाणावर परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळे हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधाचा वापर मुंबईतील झोपडपट्टी भागामध्ये करण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे.
हेही वाचा : पाहा 20 तारखेपासून मुंबईत काय सुरू होणार?
मुंबईत दिवसेंदिवस वाढणारे रुग्ण आणि होणारे मृत्यू यामुळे राज्य सरकार आणि मुख्यतः पालिका चिंतेत आहे. महाराष्ट्र राज्यातील निम्याहून म्हणजे 65 टक्क्यांहून अधिक रुग्ण एकट्या मुंबईत आहेत. जरी भारत जगाच्या तुलनेत विशेष कामगिरी करत असला तरी मुंबईची बाब चिंतेची आहे.
हेही वाचा : लॉकडाऊननंतर मुंबईतला कोरोना संपेल का?
मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, सर्वात मोठं आव्हान आहे, कोरोना व्हायरसचा संसर्ग मुंबईच्या झोपडपट्यांमध्ये पसरण्यापासून रोखण्याचं. परंतु हे होताना दिसत नाही. यासाठी आरोग्य विभागाने एक महत्वाकांक्षी योजना आखली आहे. या योजनेचा फायदा होऊन रुग्णांची संख्या कमी व्हावी हीच अपेक्षा.
आपल्या मुंबईची ख्याती ही समुद्र, तारेतारका, क्रिकेटर, लोकल, धावती मुंबई, कोणासाठी न थांबणारी मुंबई यामुळे ओळखली जायची. परंतु याच काळात झोपडपट्टीमुळे देखील मुंबई ओळखली होऊ लागली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईतील धारावी झोपडपट्टीची ख्याती आहे. परंतु हीच ख्याती धोक्याची घंटा आहे. धारावीमध्ये तब्बल 80 हजार झोपडपट्ट्या आहेत. सर्वात मोठ्या झोपडपट्टीत 15 लाख लोक राहतात. 100 फुटांपेक्षा कमी जागेत 8-10 लोक राहतात. धारावीत आतापर्यंत कोव्हिड-19 चे 60 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. झोपडपट्टी भागात कोरोनाचा प्रसार झाला आहे, त्यामुळे हा प्रसार रोखण्यासाठी पुढील आठवड्यात तेथील दोन लाख रहिवाशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध देण्यात येणार आहे. धारावी, वरळी कोळीवाडा आणि जिजामाता नगर या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही खबरदारी घेतलेली आहे. तज्ज्ञांच्या मते, धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची असेल तर या औषधाचा वापर करून पाहाणं अयोग्य नाही.
काय आहे राज्य सरकारची योजना?
या योजनेबाबत माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी म्हटलं, “तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार मुंबईत प्रतिबंधात्मक योजना आणि कोरोनाची व्याप्ती रोखण्यासाठी धारावी, वरळी-कोळीवाडा आणि जिजामाता नगर परिसरात दोन लाख लोकांना 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे औषध 15 वर्षाखालील मुलं, हृदय आणि यकृतासंबंधी आजार असलेल्यांना दिलं जाणार नाही.
हायड्रोक्सिक्लोरोक्वीनमुळे काय होईल?
“हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोव्हिड-19 इन्फेक्शनचा वेळ आणि तीव्रता कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. या औषधामुळे आजारात निर्माण होणारी गुंतागुत आणि मृत्यूची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यताही कमी होण्यास मदत होईल.”
याबद्दल डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की "हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ चा कोव्हिड-19 विरोधात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदा झाल्याचा काहीच वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. पण या औषधातील मेकॅनिझमचा फायदा कोव्हिड-19 व्हायरसला शरीरातील पेशींमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी होऊ शकतो.”
हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’औषध कोणाला दिलं जातं?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मलेरिया आणि रूमटॉईड आर्थरायटिसवर उपचारांसाठी या औषधाचा वापर करण्यात येतो.
हेही वाचा ः वेळीच कोरोना थांबला नाही तर धारावीत...
“हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या वापराला भारतात मान्यता देण्यात आली आहे. मधुमेह आणि रूमटॉईड आर्थरायटिसवर उपचारांसाठी याचा डॉक्टर वापर करतायत. मधुमेही रुग्णांवर याचा विपरीत परिणाम होत नाही. कोव्हिड-19 च्या रुग्णांमध्ये लंग एक्सप्लोजन (lung explosion) होतं. ज्यामुळे 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’चा प्रमुख वापर म्हणजे केमिकल स्टॉर्म (Chemical Storm) होण्यापासून प्रतिबंध करणं.”
आता तुम्ही म्हणाल HCQ चा फायदा होतो याचा पुरावा काय?
महाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणतात, “कोव्हिड-19 आजाराबाबत कोणालाच जास्त माहिती नाही. कोव्हिड-19, तीन ते चार महिने फक्त जुना आजार आहे. HCQचा प्रतिबंधात्मक म्हणून फायदा होईल का? याबाबतही संशोधन झालेलं नाही. त्यामुळे याचा फायदा होईल किंवा नाही हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही. मात्र प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जे शक्य आहे, ते आपण केलं पाहिजे.”
भारतातील संशोधन क्षेत्रात काम करणारी सर्वात मोठी संस्था म्हणजे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशात 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ औषधाच्या प्रतिबंधात्मक वापरासाठी शिफारसी जारी केल्या आहेत.
“प्रयोग शाळेत झालेल्या संशोधनातून या औषधाचा फायदा होत असल्याचं समोर आलं आहे. ही भारताच्या व जगाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची काळजी घेणारे आरोग्य कर्मचारी आणि कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लक्षणं नसलेल्या व्यक्तींना हे औषध प्रतिबंधात्मक म्हणून देण्यात यावं, याबद्दल चर्चा सुरूय.
औषधाची मात्रा कशी असेल?
“इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या शिफारसींनुसार दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक डोसचा लोकांवर फारसा विपरीत परिणाम होणारा नाही. पहिल्या दिवशी 400 मिली-ग्रॅम गोळी दिवसातून दोन वेळा आणि त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यात, सात आठवड्यांपर्यंत हा डोस दिवसातून एकदा लोकांना देण्यात येणार आहे. याचा एक फायदा म्हणजे भविष्यात आपल्याला या संशोधनातून उत्तर मिळू शकतं.”
फ्रान्समध्ये 36 कोव्हिड-19 रुग्णांमधील 20 रुग्णांना हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ देण्यात आलं आणि अन्य 16 रुग्णांना फक्त सपोर्टिव्ह केअर देण्यात आली. हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ दिलेल्या रुग्णांमध्ये 70 टक्के विषाणू कमी झाल्याचं आढळून आलं. या रुग्णांची स्वॅब टेस्ट करण्यात आली. सपोर्टिव्ह केअर दिलेल्या रुग्णांमध्ये व्हायरल लोड फक्त 12 टक्के कमी झाल्याचं दिसून आलं.
हे झालं इतर अनेक देशांच्या तुलनेत परंतु भारतात मुख्यतः मुंबईतील झोपडपट्टी भागात हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा प्रभाव होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याची चाचणी मुंबईतील झोपडपट्टी भागात होणार आहे. यासाठी राज्यसरकार महत्वकांक्षी पाऊल टाकत आहे. याचा प्रभाव दिसेल आणि आपली वंटास मुंबई मैदानात कंबर कसून कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, ऑन ऑफ ड्राईव्ह, पूल-पुश फ्रंट फुटवर खेळून कोरोनाच्या भेदक गोलंदाजीच्या माऱ्यावर विजयी प्राप्त करेल, हीच अपेक्षा.

0 Comments