कोरोना संकटाच्या काळात दिवस पुढे ढकलत चालले आहे मात्र कोरोना विषाणू संपण्याचे नाव घेत नाही. आता जून महिना चालू झाला असून पावसाचे आगमन झाले. पावसाळ्यात कोरोना कोणत्या रुपात आपल्या समोर येईल, तसेच कोरोना नियंत्रणात येणार की आणखी वाढणार असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. आज आपण पावसाळ्यात कोरोनाचा नागरिकांना किती धोका संभवतो, हे पाहाणार आहोत.
कोरोना विषाणू उष्णतेच्या तापमानामध्ये टिकू शकत नाही असा दावा अनेकांकडून केला जात होता. त्यामुळे नागरिकांना गरम पाणी पिणे तसेच थंड हवेच्या गोष्टींपासून जसे की ऐसीचा कमीतकमी वापर करणे असे सांगितले जायचे. खरे पाहता याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुठलाही दुजोरा दिला गेला नाही. आपण भारतातील परिस्थिती लक्षात घेतली तर उन्हाळ्यातील कडाडीच्या उन्हातदेखील कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या वाढत आहे.
जगभरामध्ये 180 हुन अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. या देशांमधील तापमान हे अगदी थंड पासून ते अगदी उष्ण वाळवंटी प्रदेशांसारखे होते. या दोन्हीही प्रकारच्या तापमानांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. यावरून असे स्पष्ट होते की, वातावरणातील तापमान हे कोरोना विषाणूसाठी पूरक ठरत नाही.
WHO, "जागतिक आरोग्य संघटकेच्या मते, कोरोनापासून वाचावण्यासाठी हवामानावर अवलंबून राहू नका. बाहेरील तापमान हा मुद्दा नसून शरीरातील तापमान हे विषाणूसाठी अनुकुल ठरते" त्यामुळे शरीरात तयार होणारी उष्णता ही कोरोनासाठी पूरक असू शकते.
पावसाळ्यात काय असणार कोरोनाची परिस्थिती
पावसाळा सुरू झाला आणि कोरोनाविषयी परिस्थितीत आणखी चिंताजनक निर्माण झाली आहे. एका बाजूला पावसाळ्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे पावसाळ्यामध्ये असणाऱ्या हवेच्या आद्रतेमुळे कोरोनाचा धोका हा वाढू शकतो अशा अनेक चर्चा केल्या जातात. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात कोरोना संक्रमणाची भीती ही फार कमी असल्याचे सांगितले जाते. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यामुळे पृष्ठभागावर असणारे कोरोना विषाणू सौम्य होऊ शकतात, ज्याने कोरोना संक्रमणाचा धोका टाळता येऊ शकतो. तसेच रस्ते वा अनेक उघड्या ठिकाणावर पावसाचे पाणी पडत असल्याने देखील हवेमार्फत होणाऱ्या संसर्गाचे प्रमाण कमी होऊ शकते.
पावसाळ्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येची शक्यता जरी कमी वर्तविली जात असली तरी, पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे रोग हे जास्त बळावत असतात. मलेरिया, डेंगू, डायरिया, कावीळ, कॉलेरा, स्वाईन फ्लू यांसारखे साथीचे रोग मोठ्या प्रमाणावर होत असून कोरोना सोबत यांनीदेखील काळजी घेणे गरजेचे आहे.
कशी वाटली ही स्टोरी आम्हला जरूर कळवा तसेच अनेक ताज्या घडामोडींसाठी आमच्या आमच्या सोशल मिडियाशी कनेक्ट राहा...
हेही वाचाच...


0 Comments