कोरोनाच्या संकटाने संपूर्ण जग व्यापले आहे. कोरोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अर्थव्यवस्था, उद्योगधंदे, कारखाने अशा अनेकांना फटका बसला आहे. याचप्रकारे कोरोनाचा फटका हा क्रिकेटच्या खेळाला देखील बसणार आहे. असे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणतो. कोरोनाच्या संकटानंतर जेव्हा पुन्हा क्रिकेट चालू होईल तेव्हा पहिल्यासारखा खेळ असेल की नाही यामध्ये शंका आहे. विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर भारतीय फिरकीपटू रविंदरचंद्रन अश्विन सोबत लाईव्ह चर्चेत सहभागी झाला होता, या दरम्यान हे विधान केले आहे. 

कोहलीने चाहत्यांना आव्हान केलेलं आहे की क्रिकेटमध्ये आलेले नवीन बदल हे तुम्ही मनापासून स्वीकाराल या बद्दल कोणतीही समस्या नाही.

ICC ची नवी नियमावली
ICC ने 22 मे क्रिकेटचे सामने नव्याने सुरुवात करण्यासाठी नवीन नियमावली जारी केली होती. ICC ने सांगीतले की एक चीफ मेडिकल ऑफिसर किंवा बायोसेफ्टी ऑफिसरांची निवड करावी. जे सरकारी नियमांचे पालन करून सुरक्षेच्या दृष्टीने योजना आखू शकतील. 

नवीन नियमावलीनुसार सामन्याच्या 14 दिवस अगोदर खेळाडूंना वेगळ्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये ठेवून त्यांचे तापमान चेक करून, कोरोनाची चाचणी केली जाईल, तसेच खेळाडूंच्या किटचे निर्जंतुकीकरण करून आणि सोशल डिस्टन्स ठेवून सराव केला जाईल.

केवळ बाहेरच नव्हे तर खेळताना मैदानात देखील सुरक्षेच्या दृष्टीने काही नियम खेळाडूंसोबत पंचांना देखील पाळावे लागतील. खेळाडू पंचांकडे रुमाल, चष्मा, टोपी, स्वेटर, जर्सी पंचांकडे पहिल्यासारखे देऊ शकत नाहीत. गोलंदाजांना चेंडू सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष कसरत करावी लागणार आहे. खेळाडू चेंडूला थुंकी लावू शकणार नाहीत. त्याचप्रकारे आपले हात डोळ्यांना नाकाला, लावू नयेत. पंचानादेखील ग्लोवज वापरने अनिवार्य असेल. 

ICC ने म्हटले आहे की खेळाडूंच्या विमान प्रवासा दरम्यान सुरक्षित अंतर व सीटच्या दरम्यान सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. 

यादरम्यानच इंग्लंड आणि वेस्टइंडिज यांचे 3 कसोटी सामन्यांची मालिका जुलै महिन्यात सुरक्षित वातावरणात खेळण्याची योजना ICC आखत आहे.