कोरोनाचा पादुर्भाव जगात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनामुळे जगात सर्वांनी या रोगासमोर हात टेकले आहेत. यामध्येच संपूर्ण वर्तमान पत्रात आणि टीव्हीवरील एका बातमीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या बायकोला कोव्हिड 19 ची लागण झाली असून या दोघांना कराचीतल्या आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे, अशा बातम्या पसरत आहेत, पण या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिमने एका वृत्तपत्रास म्हटलं आहे.

एका वृत्तसंस्थेला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत दाऊदचा भाऊ अनीसने याविषयीचा खुलासा केला. कोरोना व्हायरसची साथ जरी जगभरात पसरलेली असली तरी दाऊद आणि संपूर्ण कुटुंबातले सगळे सदस्य नीट असून ते त्यांच्या घरी असल्याचं अनीसने या मुलाखतीत म्हटलंय. शिवाय UAE आणि पाकिस्तानमध्ये आपण वेगवेगळे उद्योग चालवत असल्याचंही अनीसने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

अशाप्रकारे एखाद्या कारणानं चर्चेत येण्याची दाऊदची ही पहिलीच वेळ नाही. दाऊदच्या अनेक आजारांच्या बातम्यांनी वर्तमान पत्रांचे मथळे या अगोदर सजले आहेत. 80-90 च्या दशकात गुन्हेगारी जगतात प्रवेश झाल्यापासून दाऊद कायमच चर्चा आणि वादांचा केंद्रबिंदू राहिला आहे.

दाऊदची सुरुवात
दाऊदचे संपूर्ण नाव दाऊद इब्राहिम कासरकर. 
दाऊदचे वडील, इब्राहीम कासकर हे मुंबई पोलिसांत कॉन्स्टेबल होते. इब्राहिम कासरकर हे आपल्या पोलीस ठाण्यात प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे कॉन्स्टेबल होते. डोंगरी - नागपाडा भागामध्ये कॉन्स्टेबल इब्राहीम कासकर यांना  महत्त्वपूर्ण मान होता. इब्राहिम कासरकर यांच्या पत्नी अमिना कासरकर. इब्राहीम आणि अमीना कासकर या जोडप्याला एकूण 12 मुलं होती. त्यापैकी एक म्हणजे दाऊद. त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हते की आपला मुलगा गुन्हेगारी क्षेत्रात आपली दहशद पसरवेल.

डोंगरी येथे सातवीमध्ये शाळा सोडल्यानंतर दाऊदने परिसरातल्या टवाळ मुलांसोबत लहान चोऱ्यामाऱ्या, लोकांच्या गळ्यातल्या साखळ्या हिसकावणं, पाकिटमारी, मारहाण अशा कारवाया सुरू केल्या. शाळेपेक्षा त्याला या विषयात अधिक रस वाटू लागला. किशोर वयात डोंगरीतल्या गल्लीतल्या मुलांची गँग तयार करणारा दाऊद विशीत येईपर्यंत पठाण गँगला आव्हान देऊ लागला होता. पठाण गँगला आव्हान देणारा एकमेव दाऊद होता. दाऊद आणि त्याचा भाऊ शब्बीर यांनी आपली टोळी चांगल्या प्रकारे तयार करून भायखळा, डोंगरी-नागपाडा या क्षेत्रात आपली दहशद निर्माण केली आणि दाऊदच्या टोळीला डी कंपनी असे नावाची चर्चा सुरू झाली. 

दाऊदच्या टोळीचा, दशकातला सर्वात मोठा दरोडा
केवळ 19 वर्षांच्या दाऊदने, भाऊ शब्बीर आणि आपल्या साथीदारांसोबत मुंबईतल्या कर्णाक बंदर भागामध्ये बँकेचे पैसे लुटले आणि गुन्हेगारी जगताचं आणि मुंबईतल्या वर्तमानपत्रांचंही लक्ष या तरुणाकडे गेलं.

हे पैसे हाजी मस्तानचे आहेत असं समजून दाऊदने ही लूट केली, पण त्याने चोरलेले पैसे हे मेट्रोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह बँकेचे होते आणि हा मुंबईतला दशकभरातला सगळ्यात मोठा दरोडा होता. आपल्या मुलाचं कृत्य ऐकून इब्राहिम कासकरना धक्का बसला.

दाऊद इब्राहिमवर ज्येष्ठ पत्रकार एस. हुसैन झैदी यांनी पुस्तक लिहिलंय. 'डोंगरी टू दुबई' या पुस्तकामध्ये या प्रसंगाचं वर्णन करताना ते लिहितात, "इब्राहिमचं त्याच्या मित्रांचं आणि हितचिंतकांचं असं स्वतःचं एक नेटवर्क होतं. त्यांच्यामार्फत त्याने दोन्ही मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली. अनेक दिवस शोधल्यानंतर ते दोघं भायखळ्यातल्या एका मित्राच्या घरी लपून बसल्याचं या संतापलेल्या बापाला समजलं. या गोष्टींमुळे इब्राहिम कासरकर यांची मान शरमेने खाली गेली. याचा मोठा मनस्ताप त्यांना झाला. त्यामुळे दाऊद व शब्बीरला आपल्या चामड्याच्या पट्याने मारले. "पण हा बाप इतक्यावर थांबला नाही. अमीनाने या दोघांना अन्न-पाणी देण्यापूर्वीच इब्राहिमने त्यांना फरफटत घराबाहेर काढलं, टॅक्सीत कोंबलं आणि क्राईम ब्रांचला आणलं. तिथल्या अधिकाऱ्यांच्या पायांवर आपल्या मुलांना घालत तो हात जोडून रडू लागला. 

मुलांनी केलेल्या लाजीरवाण्या कामाबद्दल त्याने अधिकाऱ्यांची माफी मागितली. दाऊद आणि शब्बीरची केविलवाणी अवस्था आणि इब्राहिमचा सच्चेपणा पाहत क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना स्वतःच्या मारातून सूट दिली. पण ही सूट पुढे एक डॉन घडवणार आहे, हे कोण्याच्याही लक्षात आलं नाही. पुढे अशा अनेक घटना घडल्या जिथे दाऊदला कोणत्या ना कोणत्या कारणावरून सूट मिळाली. कदाचित याच घटनेनंमुळे दाऊद इब्राहिममधल्या अंडरवर्ल्ड 'डॉन'ला जन्म दिला." दाऊदच्या अनेक कृत्यांमुळे गुन्हेगारी विश्वात आपली वेगळी जागा निर्माण करू लागला. 

दाऊद आणि बॉम्बस्फोट
पठाण गँगने शब्बीर कासकरची पेट्रोल पंपावर हत्या केली. आपल्या भावाची हत्या झाली या धक्यात दाऊद बसला. या हत्येची सुपारी मुंबईचा कुख्यात मराठी डॉन मन्या सुर्वेला दिली. दाऊदने पठाण गँगचा नाट्यमयरित्या बदला घेतला.

12 मार्च 1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मास्टरमाईंड दाऊदचा हात असल्याचा आरोप आहे. या स्फोटांमध्ये 257 जण ठार झाले तर 700 जण जखमी झाले होते.

व्यथित झालेल्या दाऊदने पाकिस्तानच्या ISIच्या मदतीने भारतामध्ये बॉम्ब आणि शस्त्र आणली. आणि 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले, असा दाऊदवर आरोप आहे. 

बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईतल्या मुसलमानांनी दाऊदकडे मदत मागितली; पण त्याने मदत केली नाही म्हणून काही मुसलमान महिलांनी दाऊदला बांगड्या पाठवल्याची चर्चा होती, असं मुंबईचे माजी पोलीस कमिशनर राकेश मारिया यांनी त्यांच्या - "लेट मी से इट नाऊ" या आत्मचरित्रात म्हटलंय.

दाऊद कुठे आहे?
"दाऊद कुठे आहे" या भारतातील चर्चेचा विषय…
दाऊद इब्राहिमने आपलं बस्तान दुबईमधून नंतर पाकिस्तानात हलवलं आणि तिथे पाकिस्तानने त्याला आसरा दिल्याचा आरोप अनेकदा करण्यात आलाय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चा पाठिंबा दाऊदला मिळत असून तो कराचीत राहत असल्याचा आरोप भारताने केला होता. पण दाऊद आणि त्याचं कुटुंब पाकिस्तानात नसल्याचं इस्लामाबादने अनेकदा म्हटलंय. दाऊद भारतातून बाहेर गेल्यापासून तो नक्की कुठे आहे, हे वृत्त कोणालाही माहीत नाही. 

दाऊद आणि बॉलिवुड
त्या काळी बॉलिवूड आणि गुन्हेगारी क्षेत्र, हे अगदी जवळच मानलं जायचं. त्यापैकीच दाऊद आणि बॉलिवूड विश्व कमालीचं जवळच आहे, अशी चर्चा होत होती. 
डी कंपनी, शूटआऊट अॅट लोखंडवाला, शूटआऊट अॅट वडाला, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा, ब्लॅक फ्रायडे अशा अनेक सिनेमांमधून मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वाचं आणि दाऊद इब्राहिमचं चित्रीकरण दाखवण्यात आलेलं आहे। 

1990 च्या दशकात दाऊद इब्राहिमने दुबईमध्ये दिलेल्या पार्ट्यांना बॉलिवुडच्या अनेक तारे - तारकांनी हजेरी लावली होती. याविषयीचे व्हिडिओजही पहायला मिळतात. आपण दाऊद इब्राहिमला दोनदा भेटल्याचं दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात म्हटलंय.
हेही वाचाच...