मुंबईत कोरोना व्हायरस संकटाचे चक्र शिथिलता घेण्याचे नाव घेत नाही, मग लॉकडाऊनला शिथिलता मिळेल का, असा गोत्यात टाकणारा प्रश्न सर्व मुंबईकरांना पडला आहे. 

दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. आता तर 4.0 लॉकडाऊन संपलायला अवघे चार दिवस उरले आहेत, मग पुन्हा लॉकडाऊन वाढेल की संपुष्टात येईल यावर वंटास मुंबईचा आजचा हा, खास रिपोर्ट.

मुंबई सद्यस्थितीला लॉकडाऊन शिथिलतादृष्टया नाजूक
अवघे दोन महिने उलटून गेले तरी मुंबईची परिस्थिती सुधारण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाचा धोका हा मुंबईत जास्त आहे. त्यातच लॉकडाऊनचा चौथा टप्पा हा संपत आलेला आहे, तरी मुंबई पूर्णतः रेड झोनमधून बाहेर पडलेली नाही. कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत मुंबईकरांना दिलासा मिळेल अशी कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच मुंबईतील लोकसंख्येचा विचार केला तर सुरक्षेच्या दृष्टीने कोरोनाचा धोका हा जास्त प्रमाणात आहे. सरसकट लॉकडाऊन उठवण्याचा विचार केला तर रुग्णसंख्येच्या जाळ्यात मुंबईकर अधिक अडकण्याची शकत्या आहे.

मुंबईतील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता?
नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार "सरसकट लॉकडाऊन उठवण्याचा कोणताही निर्णय नाही" असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. यातून सहज स्पष्टता मिळते की मुंबईतील लॉकडाऊन उठणे 'ना'च्या बरोबर आहे. जर लॉकडाऊन उठवून दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरू केले तर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. पण विस्कळीत पडलेली आर्थिक घडी नीट करणे हेदेखील मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा काही केल्या कमी होताना दिसत नाही. तसेच आता नागरिकांचे काम नसल्यामुळे खाण्या पिण्याचे हाल होत आहेत, यावर कसा मार्ग काढावा हा देखील मोठा प्रश्न आहे. सर्वसामान्य नागरिक, नोकरदार वर्ग, व्यापारी यांचा धीर आता सुटताना पहायला मिळत आहे. या सर्व प्रश्नांवर काय तोडगा आहे व आणखी काही दिवस लॉकडाऊन कायम ठेवणं शक्य आहे का, असा विचार सध्या मुख्यमंत्री करत आहेत.

लॉकडाऊन 5.0 होण्याची गरज?
संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला तर, लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता सरसकट लॉकडाऊन उठविणे धोक्याची घंटा होऊ शकते. 31 मेनंतर लॉकडाऊन 5.0 पुढे चालविण्याची गरज सध्या तरी दिसत आहे. लॉकडाऊन 5.0 सुरू करून परिस्थितीचा अभ्यास करत हळूहळू शिथिल करणे योग्य राहील. तसेच जास्तीत जास्त रेड झोनचे रूपांतर ग्रीन झोनमध्ये करण्यात सरकारला यश मिळू शकते. यामध्ये सामान्य माणसाचा विचार करून उद्योगधंदे तातडीनं सुरू व्हायला पाहिजेत, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले होते तसेच याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहमती दर्शवली. मुंबईत सार्वजनिक वाहतूक सुरु करणं अयोग्य असल्याचं मत देखील मुख्यमंत्रांनी व्यक्त केले. लॉकडाऊन 5.0 लागू झाल्यास हे शक्य आहे.

काही दिवसात पावसाळा सुरू होईल. त्यातच जुनपासून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षही सुरु होईल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत देखील अनेक प्रश्न आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला सोडला तर अन्य सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे राज्याची आर्थिक घडीही विस्कटली आहे. त्यातच लाखोंच्या संख्येनं मजुर वर्ग आपआपल्या गावी परतले आहेत. आज ना उद्या व्यवहार सुरु होतील, अशा आशेने अनेक कामगार मुंबईत आहेत. या सर्वांचा विचार करून लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल.

कशी वाटली वंटास मुंबईची ही माहीती आम्हाला जरूर कळवा आणि याबाबत आपल्याला काही शंका असतील तर त्याही तुम्ही कॉमेंट्सद्वारे आम्हाला विचारा आम्ही आपल्या शंकेचे निरसन करण्यास आग्रही असू.
हेही वाचाच...