गेले काही दिवस मुबंई लॉकडाऊन आहे. आज मुंबईत हातावरचे पोट असणारे 22 लाखाहून अधिक मजूर आहेत, जे परप्रांतिय आहेत, पण त्यांचा मुंबईत एक भाड्याची खोली सोडली तर कोणताच ठावठिकाणा नाही किंवा नव्हता. असे अनेक लोक ट्रेन, ट्रक मिळेल ते वाहन आणि चालत यापैकी जे जमेल तशापध्दतीने गावी जाण्यासाठी निघाले आहेत.
गावी जाण्यासाठी निघणाऱ्यांमध्ये फक्त परप्रांतीय आहेत, असं नाही तर यामध्ये काही कोकणात राहाणाऱ्यांचा तसेच महाराष्ट्रातील अनेक नागरिकांचादेखील समावेश आहे, जे काही रोजीरोटी कमवण्यासाठी मुंबईत आले होते. यासगळ्यांशी ज्यावेळी वंटास टीमने बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी हजारो उत्तरे समोर आली.
परप्रांतीय काय म्हणतात...?
अनेकांचं म्हणणं आहे की आमच्या वाईट काळात मुंबईने आम्हाला साथ दिली; मात्र आम्ही मुंबईला तिच्या वाईट काळात साथ देऊ शकत नाही, कारण साथ देण्यासाठी लागणारी भाकर आम्हाला इथे मिळत नाही. आम्ही मुंबईकडे अजूनही आशेने बघतो, मात्र या व्हायरसमुळे मुंबई कधी सुरू होईल, आम्हाला नोकरी कधी मिळेल आणि आमच्या घरात पैसा कधी मिळेल, याची काहीच शक्यता नाही. आम्ही गावी जात आहोत खरं मात्र शेवटपर्यंत आम्ही गावी पोहोचू याचीही कोणती शाश्वती आम्ही देऊ शकत नाही. आम्ही चाालत जात आहोत, आमच्याकडे कोणतीच गाडी नाही, आम्हाला कोण लिफ्टदेखील देत नाहीत, कुठेतरी मध्येच एकेठिकाणी देवाच्या कृपेने जेवन मिळते, त्यामुळे आम्हाला पुढचा रस्ता चालण्याची ताकद मिळते.
मी आयुष्यात पुन्हा मुंबईला येणार नाही...
वंटास टीमने ठाणे ते भिंवडी नाका असा अनेक तरुणांशी बोलत प्रवास केला, त्यावेळी अनेकांनी अशी खंत व्यक्त केली आहे. आम्ही मुंबईत पैसे कमवण्यासाठी येतो. आम्ही एकदा आलो की मिळेल ते काम करतो आणि 2 वर्षांनी परत गावकऱ्यांना भेटण्यासाठी जातो. मात्र आता आमच्याकडे पैसे नाहीत. त्यातला एकटा म्हणतो की मी मागील 2 महिण्यांसाठी 20 हजार रुपये घराकडून मागून घेतले होते, त्यातले माझ्याकडे 500 रुपये उरले आहेत. मला खोलीचं भाडं द्यावं लागलं, जेवणाचे खर्च वाढले आहेत, पगार नसल्यामुळे मागील काही उदारी थकील होती, ती भरावी लागली, आमच्या मालकाने सरळ आम्हाला सॉरी म्हटलं आहे, ते आम्हाला बाळगू शकणार नाहीत, असं स्पष्ट सांगितलं आहे. मुंबईने आम्हाला खूप सांबाळलं, पण आता इथलं सरकारदेखील आम्हाला मदत करत नाही, आम्ही ट्रेनसाठी अप्लाय केलं, पण कोणतच उत्तर त्यांच्याकडून येत नाही, ती वाट बघण्यापेक्षा आम्ही आता घरी निघतोय. मी परत मुंबईमध्ये येणार नाही, मी माझ्या मुलांनाही सांगेण, काय असेल ते इथच खाऊ, एकवेळ उपाशी राहू, पण मुंबईला जाऊ नका. असा सुर आता अनेक परप्रांतियांच्या शब्तातून उमटत आहे.
हा लेख कसा वाटला, हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा, याव्यतिरिक्त कोणती माहिती हवी असेल, तर त्याबद्दलही सुचवा, ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत वंटास मुंबईच्या माध्यमातून नक्की पोहोचवू.
हेही वाचाच...


1 Comments
ते घाबरलेले आहेत मरणाच्या शक्यतेच्या अनामिक भीतीने. घरी पण वास्तव वाट बघत असेल काही इलाज नसतो काळा पुढे.
ReplyDeleteसिंदाबाद च्या सफरी प्रमाणे सिंदाबाद दर सफरीच्या शेवटी त्रास सहन करून म्हणतो आता परत सफरींना जाणार नाही.
पण घरी आल्यावर वाळवंटातील वास्तव त्याला परत सफरीं वर पाठवत राहते. घरातील गरजा त्याला परत परत सफरीवर पाठवत राहतात. अगदी अरेबिअन नाईटस प्रमाणे.
काळ बदलत गेला पण गरजा त्याच राहिल्या अनादी काळापासून.