सुरुवातीलाच स्पष्ट करणे गरजेचे आहे, की हा लेख त्या 36 दिवासांसंबंधीत आहे, ज्याने महाराष्ट्रासोबतच देशात इतिहास घडवला. ते 36 दिवस ज्या पत्रकारांनी ग्राऊंडवरून अनुभवले, ज्या प्रेषकांनी टिव्हीसमोर बसून पाहिले आणि ज्या नेत्यांचं या दिवासात पाणी-पाणी झालं, ते कोणीच हे दिवस विसरू शकणार नाही. मग आम्हीतरी ते 36 दिवस कसे विसरेन.
आज अचानक त्या 36 दिवसांची आठवण काढण्याचं कारण एकच की त्या ऐतिहासिक 36 दिवसांचं वर्णन करणारी तीन पुस्तके एकाच दिवशी तुमच्या भेटीला आलेत.
या 36 दिवसांत शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिघेच मुख्यभुमिकेत होते. कॉंग्रेस पक्ष यामध्ये राष्ट्रवादीच्या सहकलाकाराच्या भुमिकेत दिसत होता. याच्यात अजून फोड करायची म्हणजे अजित पवार, संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस या तीन मुख्यकलाकारांनी हे 36 दिवस मोठ्याप्रमाणात गाजवले होते.
तो 26 नोव्हेंबर 2019 चा दिवस होता, त्या दिवशी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला तब्बल 10 वर्ष पुर्ण झाली होती. मुंबईतल्या मरिन ड्राईव्हवरती त्याकाळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अनेक मंत्री तात्काळ उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांची वाट पाहात होते. मात्र अजित पवार इकडे न जाता त्या 36 दिवसातलं राजकारण ज्या चार भिंतीत चाललं, त्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये पोहोचले. तिथूनपुढचा प्रवास अनेकांनी आपल्या डोळ्यामध्ये साठवून ठेवला असेल आणि तसा तो प्रवास होताच. याच 36 दिवसांच्या प्रवासाचं वर्णन करणारी तिन पुस्तके आज तुमच्या भेटीला आलेत.
- पत्रकार जितेंद्र दीक्षित यांचं '35 डेज: हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019'
- पत्रकार कमलेश सुतार याचं '36 डेज ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट अॅम्बिशन बिट्रेयल'
- पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अॅन्ड लॉस्ट महाराष्ट्र'
नेमकं सत्ता स्थापन कोण करणार, यावर निर्णय होण्यासाठी राज्यातल्या सगळ्याच पक्षांना तब्बल 36 दिवस वाट पाहावी लागली होती, मात्र 36 दिवसानंतर जो अनाकलनिय निर्णय अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता, त्याचं रहस्य उलघडणारे पुढचे 80 तासही तितकेच महत्वाचे ठरले होते. या सगळ्यात शिवसेनेच्या संजय राऊत यांना आजही गेमचेंजर म्हणून ओळखले जाते तर शरद पवारांना किंग मेकर म्हणून पदवी दिली जातेय.
36 दिवसांमध्ये अजून एक ऐतिहासिक घटना घडली होती, ती म्हणजे आतापर्यंत कधीही न चुकणाऱ्या सगळ्याच वृत्तपत्रांचे प्रमुख मथळे चुकले होते. त्या 36 दिवसांमधल्या आणि 80 तासांतल्या पडद्या आडच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या तीन पुस्तकांमध्ये वाचायला मिळणार आहेत.
अजित पवारांनी हा निर्णय का घेतला, देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना सोबत का घेतलं, यावेळी केंद्राची भुमिका काय होती, शरद पवाराचं काय मत होतं, संजय राऊत यांचा तगडा कॉन्फिडन्स, उध्दव ठाकरे यांची भुमिका, सत्ताबदलाची सुत्र, सकाळी 6 वाजताची शपथ, सोफिटेल हॉटच्या मागच्या दरवाजाची कहानी, हॉटेल ट्रायडेंटमधली रणनिती, राज्यातले सगळे आमदार मुंबईतच्या हॉटेलमध्ये अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पुस्तकातून मिळणार आहेत. त्यामुळे पडद्या मागच्या भुमिका मांडणाऱ्या या तीन पुस्तकांना आणि वेळोवेळी मुंबईची स्पेशल खबर देणाऱ्या वंटास मुंबईला वाचायला विसरू नका.


0 Comments