कोरोना व्हायरसने आपले क्षेत्र खूपच मोठं करून घेतलं आहे. हात लावेन तिथे गुदगुल्या अशीएक म्हण आहे, मात्र आता हात लावेन तिथे कोरोनाचा विषाणू, अशी परिस्थिती निर्माण झालीआहे. त्यामुळे आपल्या प्रशासनाकडून, वैद्यकिय अधिकाऱ्यांकडून किंवा अनेक जानकार मंडळींकडून आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे. विशेषतः हाथ स्वच्छं धुणे, बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे आणि हाताला सॅनिटायझर लावणे यावर भर दिला जातोय.

वरील सगळ्यासोबत आजूबाजूच्या परिसरावरदेखील प्रशासन बारीक लक्ष ठेवून आहे. आपला राहाता परिसर स्वच्छ ठेवाण्याबद्दलही वारंवार सुचना केल्या जात आहेत. या सर्वांचा विचार करता कोरोना विषाणूपासून दूर राहण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरात महापालिका, नगरसेवक तसेच अनेक खाजगी संस्थांकडून एका द्रव्याची फवारणी केली जात आहे. त्यामुळे तुमच्यासारखा आम्हालाही प्रश्न पडला, की नक्की हे द्रव्य नेमकं आहे तरी काय आणि ही फवारणी का केली जातेय?

कोरोना विषाणूवर अद्यापही ठोस औषध मिळाले नसल्याने धोकादायक आजारामध्ये ह्याची गणना केली जातेय. हवेमार्फत, स्पर्शामार्फत हा व्हायरस आपल्या शरिरात प्रवेश करू शकतो, असेदेखील काही शास्त्रज्ञांचं म्हणनं आहे. आता हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून बचावण्याचा एकमेव उपाय म्हणजे हवेत जंतुनाशक औषधांची फवारणी केली पाहिजे.

या जंतुनाशक फवारणीमुळे कोरोना विषाणू मरतो का? 
जंतुनाशक फवारणीद्वारे कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली जाऊ शकते, असं काही वैद्यकिय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. फवारणीमध्ये जास्तीत जास्त जंतुनाशक पदार्थांचा वापर केला जातो, जेणेकरून हवेतील वा एखाद्या वस्तूवर असलेले जंतू मरून जातात. त्या द्रव्यात असलेल्या नाशकांच्या टक्केवारीनुसार जर वापर केला, तर हवेत असलेले अनेक विषाणु मरु शकतात, त्यात कोरोनासारख्या विषाणुचादेखील समावेश होतो.

जंतुनाशक फवारणीमध्ये कशाचा समावेश असतो? 
क्लोरिन, सॅनिटायझर, सोडियम हायफोक्लोराइट आणि काही प्रमाणात पाणी, यांचा वापर त्या द्रव्यात केला जातो. जे शुध्दीकरणासाठी तसेच एखादी जागा निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरले जाते. ब्लिचिंगचा वापर करूनदेखील काही ठिकाणी निर्जंतुकीकरण केले जाते. तसेच फवारणीमध्ये डेटॉल आणि सॅनिटीझरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. डेटॉल एंटीसेप्टिक जंतुनाशक द्रव आहे. जो जीवाणू नष्ट करून आजारापासून दूर ठेवतो. सॅनिटायझर हा एक द्रव पदार्थ आहे, जो सामान्यत: हातावरून संसर्गजन्य होण्यापासून रोखतो.