येत्या 14 एप्रिल नंतर मुंबईतील लॉक डाऊन संपणार का? संपला तरी त्यांनतर संपूर्ण स्थिती पूर्ववत होईल का? आणि झालीच, तर ते कितपत सुरक्षित असेल? असे अनेक प्रश्न मुंबईकरांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. मात्र दिवसेंदिवस पॉजिटीव्ह रुग्णांचा आकडा वाढत चालल्याने केंद्र किंवा महाराष्ट्र सरकार हा धोक्याचा निर्णय घेईल का? असा सवाल सध्यातरी सगळ्यांसमोर उभा आहे, त्यामुळे आम्हीही हाच सवाल घेऊन तुमच्यासमोर आलो आहोत.

केंद्र आणि राज्य सरकारच्या मनात काय आहे?
"तूर्तास केंद्र व राज्य सरकारकडून लॉकडाऊन विषयी पुढील निर्णय काय असेल?" याबाबत संदिग्धता कायम आहे. कोरोना रुग्णांचा आढावा घेतला तर देशात महाराष्ट्र आणि राज्यात मुंबई हे सर्वाधिक रुग्णांचं ठिकाण म्हणून समोर आलं आहे आणि हा आकडा स्थिर नसून दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हे सगळं असताना "14 एप्रिलनंतर लॉकडाऊनची मुदत वाढेल का?" अशा चर्चा होताना दिसत आहेत. सध्याच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी "लॉकडाऊनची मुदत 15 एप्रिल रोजी संपेल, अशी अपेक्षा करू नये. तसेच मुंबई आणि पुण्यात विशेष काळजी घेण्याची गरज आहे, कारण या शहरांमध्ये रुग्णांची संख्या वाढत चालल्याची माहिती आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधून दिली." 

काय म्हणतात मुंख्यमंत्री उध्दव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स नंतर असे म्हटले होते की, "१५ एप्रिलनंतर एकदम लॉकडाऊन न संपवता राज्यातील स्थितीनुसार टप्प्याटप्प्यानं याचं नियोजन केलं जाईल. कारण एकदम लॉक डाऊन हटवला तर लोकांचे घोळकेच्या घोळके बाहेर पडतील आणि सर्व काही व्यवस्थित सुरु झाले आहे, असं समजून लोक रस्त्यावर येऊन पुन्हा सोशल डिस्टंसिंग तोडतील, म्हणून हा निर्णय घेण्याचं नियोजन सुरू आहे, असे देखील ते म्हणाले. हे सगळं जरी ठिक असलं तरी अद्याप कोणत्याच प्रशासनाने लॉकडाऊन हटवण्याची वा त्याची मुदत वाढवण्याची अधिकृतरित्या घोषणा केली नाही, मात्र सध्या सरकारी धोरण ज्या दिशेने चाललं आहे, त्यावरून लॉकडाऊनची मुदत वाढेल की संपेल, याचा अंदाज आपल्याला काढता येऊ शकतो. 

मुंबईचा लॉकडाऊन का हटवू शकतात?
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक परराष्ट्रातील मोठे व्यवहार हे या शहरातून होत असतात. इथे अनेक छोटे मोठे उद्योग आहेत, ज्यामुळे देशाच्या तिजोरीत टॅक्स स्वरुपात भर पडत असते, अनेट मोठे उद्योजकांचे याच शहरात ऑफिसेस आहेत. अनेक बँकांचे व्यवहार या शहरातून चालू असतात. अनेक रोजगार या शहरात दरदिवशी निर्माण होत असतात, एकंदरित छोट्यांपासून मोठे अनेक व्यवहार या शहारातून होत असतात, अनेक गरिब वस्ती या शहरात आहे, त्यामुळे या मुद्द्यांचा विचार करून मुंबईचा लॉकडाऊन हटवू शकतात.

शेवट काय होऊ शकतो?
"मुंबईकरांच्या दृष्टीने मुंबईमधला लॉकडाऊन संपवणे", हा निर्णय सरकार पुढे मोठा पेच निर्माण करणारा ठरत आहे. चला असं समजून जाऊ की महाराष्ट्रासह मुंबईतलाही अनेक कारणांमुळे लॉकडाऊन संपवला तरी कदाचित सरकार पूर्णतः सर्व सेवा पहिल्यासारख्या सुरू करणार नाही. कारण त्यामुळे लोकांच्या मनातील कोरोनाविषयीची धास्ती कमी होऊन पुन्हा गर्दी वाढण्याची जास्त शक्यता आहे. 21 दिवसाच्या लॉक डाऊनच्या काळात रेल्वे सेवा, मॉल्स, शाळा, कॉलेज, हवाई वाहतूक, मनोरंजनाच्या गोष्टी, किराना माल सोडून इतर दुकाने अशा अनेक सेवांवर मज्जाव घालण्यात आला आहे. मग आता जरी लॉकडाऊन संपवण्यात आला, तरी या सर्व सेवा सरकार परिस्थितीचा आढावा घेत हळू हळू पूर्वपदावर आणण्याच्या मार्गावर असेल. 

हेही वाचा...