"स्वप्नांची नगरी" म्हणजे आपली मुंबई. या चमचमनाऱ्या मुंबईत हर एक जन आपले नशीब आजमवु इच्छितो. त्यातच मुंबई कधी कुणाला निराश नाही करत. कष्ट केलेल्याची मुंबईमुळे चांदी होताना आपण अनेकदा ऐकले. तुम्हाला माहीत आहे का, ह्याच आपल्या स्वप्नांच्या नगरीतून शिकून अनेक सिनेतारका आज बॉलीवूडमध्ये आपली शाईन उमटवत आहेत.
वंटास टीम तुमच्यासाठी खास खबर घेऊन आलीये, ज्याने तुम्ही मुंबईकर असल्याचा गर्व होईल. आज आपण बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या अशा हिरॉइन्सबद्दल बोलणार आहोत, ज्या मुंबईच्या नामांकित कॉलेजमधून शिकून पुढे गेलेल्या आहेत. 

प्रियंका चोप्रा
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही मुंबईतील जयहिंद कॉलेजची स्टुडंट आहे. आपल्या वंटास मुंबईच्या कॉलेजमधून शिकलेली ही देशी गर्ल विदेशापार काम करत आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.

आपल्या देसीगर्लला आधी गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती, पण मिस इंडिया बनल्यानंतर आणि मॉडेलिंग क्षेत्रात आल्यानंतर तिला तीच्या अभ्यासाला पूर्णविराम द्यावा लागला. 

सोनम कपूर
लाईफस्टाईल आणि कॉस्च्युमसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सोनम कपूरने मुंबईच्या आर्या विद्या मंदिर शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. 

नंतर बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिला पदव्युत्तर शिक्षण सोडावे लागले होते. आजही तिला शिक्षणाबद्दल विचारले तर शिक्षण पूर्ण न करू शकल्याची खंत ती व्यक्त करते.

सोनाक्षी सिन्हा
दबंग गर्ल म्हणून बॉलीवूडमध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवणारी सोनाक्षी सिन्हा आपल्या मुंबईच्या आर्या विद्या मंदिर शाळेत शिकली आहे. जन्म हा जरी बिहारच्या पटनायेथील असला तरी तिने मुंबईमध्ये शिक्षण घेणे पसंद केले.

मुंबईच्या आर्या विद्या मंदिर शाळेतून शिकून सोनाक्षीने मुंबईच्या माटुंगा येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठातून (SNDT Women's College) फॅशन डिझायनिंगची पदवी मिळविली.

प्रिया बापट
मुंबईमध्ये जन्मलेली प्रिया बापट ही आपली मराठमोळी अभिनेत्री असून तिने हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने तिचे शिक्षण मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजमध्ये पूर्ण केले आहे.

2013 साली काकस्पर्श चित्रपटामुळे स्क्रीन अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तिला मिळालाय तर हॅपी जर्नी या चित्रपटामुळे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्रियाला मिळाला आहे. 

डायना पेंटी
सौंदयासाठी विशेष चर्चेत असणारी डायना पेंटी ही एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे, जी हिंदी चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे असणाऱ्या सेंट झेविअर्स कॉलेजची ती विशेष अल्युमिनि आहे; जी बॉलीवूड मध्ये काम करते. 

2005 मध्ये तिने तिच्या मॉडेलिंग कारकीर्दीची सुरुवात केली. डायनाने 2012 मध्ये कॉकटेल या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

विद्या बालन
मुंबईत जन्मलेली ही अभिनेत्री स्त्री-चित्रपट असलेल्या चित्रपटातील भूमिकांमुळे हिंदी चित्रपटातील महिलांच्या भूमिकेत बदल घडवून आणणारी आपली विद्या बालन ही अनेकांची पसंती आहे. विद्या बालन या अभिनेत्रीने मुंबईतील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूल मधून शिक्षण घेतले आहे.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या आणि धांसू अभिनयासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विद्या बालनला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 6 फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2014 मध्ये तिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारानेदेखील सन्मानित केले आहे.

सोनाली बेंद्रे 
मुंबईत जन्मलेली आणि खुद्द मुंबईची रहवासी असणारी मराठमोळी सोनाली ही बॉलीवूड मधील सर्वात सुंदर चेहऱ्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

सोनाली ही रामनारायण रुईया कॉलेजची विद्यार्थिनी आहे. गेल्या वर्षी कॅन्सरशी झुंज देत आपली ही अभिनेत्री आता उत्तम स्वास्थ अनुभवत आहे. 

ईशा कोप्पिकर
ईशा ही बॉलीवूड अभिनेत्री असून एक राजकारणी आणि मॉडेलदेखील आहे. ईशाने हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये उत्तम काम केले आहे.

ईशा ही मुंबईतील रामनारायण रुईया कॉलेजची स्टुडंट आहे. जी आता बॉलीवूड पासून थोडी दूर आपले आयुष्य जगत आहे.

आहे की नाही मुंबईची कॉलर टाईट करणारी बातमी. एवढ्या मोठ्या नामांकित असलेल्या अभिनेत्री जर आपल्या मुंबईतून शिकून जात असतील तर आपली मुंबई सिनेतारकांची शिक्षणवाहिनीच म्हणावी लागेल...

कशी वाटली स्टोरी, आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला मुंबईची कोणती माहिती हवी आहे हेही कळवा...