काल सकाळ झाली आणि ठीक 10-11च्या सुमारास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेला कळवले, मी स्वतः भारतातील तमाम जनतेशी आज रात्री ठीक आठ वाजता संवाद साधणार आहे. असाच काहीसा संवाद 2016 साली नोट बंदीच्या वेळी साधला होता आणि जनतेला बँकेच्या रांगेत उभे केले होते. याच प्रकारे सर्वांना स्वप्न पडायला लागली. रात्री आठ म्हणजे "कुछ तो गडबड", भारतातील जनतेने तर्क-वितर्क सुरू केले. मोदी काय घोषणा करणार. पण हे तर्क-वितर्क थोडे कमी अधिक स्वरूपाचे होते त्याच कारण कोरोनाच देशावरील संकट.
आठ वाजले आणि सर्व माध्यमांवर एकच आवाज घुमला मेरे प्यारे देशवासीयो. पण या आवाजात पहिल्या सारखी ताकद नव्हती, तो आवाज दुःखदायक होता. यावरून समजलं कोरोनामुळे राजाच दुःखी आहे त्यामुळे प्रजेकडे प्रजेच्या सुरक्षेसाठी आणि काळजीसाठी.
कोरोनाच्या वाढत्या पादूर्भाव पाहता देशाचे भले होईल असा निर्णय शेवठी घेतला तो म्हणजे पुढील 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन. देशभरात लॉकडाउनची घोषणा झाली आणि सर्व भारतीय चलबिचल झाले.
महाराष्ट्रातील जनता तर आपले राशन पाणी भरण्यास सुरुवात करणार एवढ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आणि जनतेला मोलाचे आव्हान केले. अत्यावश्यक सेवा चालू राहतील अस मुख्यमंत्री महोदयांनी सांगीतले.
आजचा दिवस उजाडला तो मराठी नवं वर्षाचा. पहाट झाली आणि मुंबईकरांची रस्त्यावर, भाजी मार्केटमध्ये इतर ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली, पण ही गर्दी कशासाठी?
मंडळी, मुंबई लॉकडाऊन तरीही तुम्ही बाहेर पडता. आता हे सगळं बाहेरच्या लोकांना माहित नाही की तुम्ही नेमकं कशासाठी बाहेर पडता. आता आम्ही सांगतो, की ही सगळी मुंबईची लोकं जनता कर्फ्यु, जमावबंदी, लॉकडाऊन, संचारबंदी असूनही घराबाहेर का पडत आहेत.
तर कसंय मंडळी, पंतप्रधान साहेबांनी एकदम 21 दिवसांसाठी देश बंद करून टाकला. आता थेट वरून आदेश आलेत म्हणजे आपण सगळ्यांना त्यांचं ऐकावं तर लागणारच. म्हणून अनेक मुंबईकरांनी आपले कामधंदे, व्यवसाय, नोकऱ्या सगळंकाही सोडून घरात बसण्याचा निर्णय घेतला. आता तुम्हीच सांगा, काम धंदा सोडून घरी बसलो तरी पोटापाण्यासाठी तर काहीतरी करावं लागेल ना? मग हीच पोटापाण्याची सोय करण्यासाठी मुंबईकर बाहेर पडले.
संपूर्ण मुंबईत शुकशुकाट असताना लालबागसारख्या अनेक परिसरात भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. रविवारपासून जनता कर्फ्युच्या नादात असलेले अनेक लोक आता घरातील संपलेला भाजीपाला भरण्यासाठी रस्त्यावर उतरले.
आता सरकारने घोषित केलय की जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडु शकता, पण कसं? तर एकदम शिस्तीत. आता इथे झालय काय, तर मुंबई म्हटलं तर नुसता धावाधाव, त्यामुळे घरात माणसं कोंडून बसू लागली, तर ती मुंबई कशी होईल ना?
इथल्या घरात राहणाऱ्या म्हणजे work from home करणाऱ्या अनेकांना भाजीपाला, गॅस सिलेंडर, अत्यावश्यक वस्तू आणि आता घरात कोंडून राहायचं म्हणजे सोबत करमणुकीसाठी काहीतरी लागेलच ना? आणि तस पाहायला गेल्यास तुम्हीही ज्याच्यासाठी घरातून बाहेर पडलाय, ते पण कारण आहेच.
तर या सगळ्यासाठी आपले लाडाचे, वंटास मुंबईकर घरातून बाहेर पडतात




0 Comments