चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले. जगभरातील 180 हुन अधिक देशातील लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली असून, लाखो लोकांचे मृत्य झाले आहेत. 

आजची परिस्थिती पाहिली तर कोरोनाचा उगम झालेल्या देश आता अंशतः कोरोना मुक्त झालेला पाहायला मिळतो. दुसरीकडे आपण पाहिले तर मुंबईसारख्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. हजारोंच्या संख्येत लोकांना संक्रमण झालेल्या चीनने कशी केली कोरोनावर मात, हे आज आपण वंटास मुंबईच्या खास रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच मुंबईच्या परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेत चीनसारख्या काही योजना आपण राबवू शकतो, जेणेकरून कोरोनावर आपल्याला मात करता येईल, हेही आपण जाणून घेणार आहोत. 

चीनमधील वुहानची एकूण परिस्तिथी
कोरोना व्हायरसचा उगम झाला तो चीनमधील वुहान शहरातील सी फूड मार्केट मधून. (असं अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, अधिकृतपणे कोणतीच माहिती समोर आली नाही की नेमका व्हायरस कुठून निर्माण झालाय) 2019 च्या डिसेंबर महिन्यापासूनच कोरोनाची लक्षण आढळून चीनमधील वातावरण भीतीदायक झाले. आकडे जसजसे वाढू लागले, तसे सर्वात आधी शहरातील सी फूड मार्केट बंद करण्यात आले होते. त्यांनंतर कोरोनापासून बचावासाठी 3 महिन्यासाठी चीन शहरातील 1 कोटी 10 लाख लोकांना घरात बंद व्हावे लागले होते. 2020 च्या जानेवारी महिन्यात चीनमध्ये लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोरोनामुळे चीनमध्ये मरणाऱ्यांचा आकडा हा 495 इतका होता. कालांतराने तो तासागणित वाढत गेला. एकूण जर आपण मृतांचा आकडा पाहिला तर चीनने दिलेल्या माहितीनुसार हा आकडा चार हजारांच्या आसपास आहे. अखेर 77 दिवसांच्या लॉकडाऊन नंतर कोरोना महामारी आटोक्यात आल्याची माहिती चीन ने दिली. एकूण चीनमधील कोरोना संक्रमित रुग्ण 83,030 इतके असून त्यापैकी 4,634 इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. तसेच 78,329 कोरोना बाधितांनी कोरोनावर मात करून ते सुखरूप त्यांच्या घरी पोहचले, अशी माहिती चीनच्या प्रेसिडेंट यांनी पत्रकार परिषदेत दिली.

चीनने कशी केली कोरोनावर मात
अनेक संशोधनांनंतर कोरोना विषाणू चीनमधील वुहान शहरातून पसरला असे समजताच 1 जानेवारी रोजी स्थानिक प्रशासनाने वुहान मधील सी फूड मार्केट बंद केले होते. तसेच जानेवारी महिन्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी त्यावेळी फक्त 38 हजार कर्मचारी काम करत होते, परंतु तुलनेने रुग्ण संख्या जास्त वाढत होती. चीन शहरात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली. रुग्ण संख्या वाढत असताना वुहान शहरात असलेली 200 रुग्णालये कोरोना उपचारासाठी कमी पडू लागली त्यामुळे तब्बल 1 हजार बेड असलेलं रुग्णालय स्पेशल कोरोनासाठी उभारण्यात आले. 

कालांतराने तेव्हढही पुरेसे नसल्याने 1600 बेड्सचे दुसरे रुग्णालय उभारले गेले. हा चीनने कमी कालावधीत केलेला जागतिक इतिहास होता. रुग्णसंख्या वाढत चालली असताना आरोग्य सेवेत मोठी कमतरता भासू लागली, ती भरून काढण्यासाठी मिलिटरी सेवेतील डॉक्टर जवान मदतीला बोलविण्यात आले. चीनमधील वेगवेगळ्या शहरातून कोरोना रुग्ण उपचारासाठी 10 हजार नर्सेस पुढे आल्या. आरोग्य साहित्याची कमी भासत असल्यामुळे 3 प्रायव्हेट कंपन्या शहराला औषध पुरविण्याचे काम करत होत्या, तसेच देशातील वेगवेगळ्या भागातून चीनला आरोग्य साहित्य पुरविण्याचे काम सुरू झाले. वूहानला दिवसाला 3 लाख N95 मास्क पुरविण्यात येत होते. 

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी चीनने एकच निर्णय घेतला, तो म्हणजे "नॉक नॉक". मोठी आरोग्य सेवा, कर्मचारी तैनात करून चीन शहरातील प्रत्येक घरात जाऊन त्यांनी तेथील रहिवाशांची कोरोना टेस्टिंग केली. यामध्ये सामान्य माणूस, कोरोना संशयित आणि कोरोना बाधित यांना वेगळं करण्यात आले. याप्रमाणे पुढील नियोजन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. याने रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊन कोरोना व्हायरस काही प्रमाणात नाहीसा झाला. 

मुंबईची काय आहे आताची परिस्थिती
मुंबईचे कोरोना रुग्णांचे आकडे हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आतापर्यंत (6 जून 2020) आपण कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहिली तर ती 47,354 इतकी असून त्यातील आता 25,794 रुग्ण हे ऍक्टिव्ह केसेसमध्ये येतात. बाकी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 19,977 इतकी आहे. मुंबईतील काही मोजक्या हॉस्पिटलमध्ये कोरोना आजारावर उपचार केले जातात. आता मुंबईतील कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता कस्तुरबा परिसरात तीन मजली नवी प्री इंजिनिअर्ड बिल्डींग उभारण्यात येणार येत आहे. तसेच आता काही आठवड्या पूर्वीच कोरोना टेस्टिंग लॅबची संख्या वाढलेली आपल्याला दिसून येते. 

मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे संक्रमण क्लोज कॉन्टॅक्टमुळे जास्त वाढत असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे. मुंबईची परिस्थिती काहीशी चीनच्या वूहानसारखीच होताना दिसत आहे, होम टू होम जाऊन टेस्टिंगच्या प्रमाणात वाढ केला असल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात जितक्या टेस्टिंग आतापर्यंत झाल्यात तितक्या एकट्या मुंबईत होणं गरजेचं होतं. धारावी सारख्या संपूर्ण परिसराचं टेस्टिंग होणं खूप गरजेचं आहे. 

वूहान शहर बंद करण्याआधी वेल अँड प्रि डेव्हलप्ड प्लॅन त्यांनी आखला होता, मात्र मुंबई आणि देश बंद करताना कोणताच प्लॅन सरकारचा तयार नव्हता, हे सगळ्यात मोठं कोरोना संक्रमणाच प्रमाण वाढण्याचं कारण आहे. 

हेही वाचाच...