मार्च महिन्यात कोरोना संकटामुळे शाळा, विद्यालये तसेच महाविद्यालयांना लॉकडाऊन करण्यात आले म्हणजे कधी न बंद होणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना टाळा लावण्यात आला. जून महिना म्हणजे शैक्षणिक वर्षाची सुरूवात मानली जाते, आता सरकारने देखील काही अटी शर्थींवर शाळा व महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
सरकारने अनलॉक 1.0 ची घोषणा केली, त्यात कोणत्या गोष्टी सुरू केल्या जातील, याबद्दलचं स्पष्टीकरणही दिलं, सोबतच शाळा आणि महाविद्यालये कशाप्रकारे सुरू करता येतील याकडे लक्ष केंद्रित केले. आता लॉकडाऊननंतर शाळा महाविद्यालये कशाप्रकारे असतील, यामध्ये कोणकोणते बदल होत आहेत, तसेच कोरोना पासून बचावण्यासाठी काय उपाययोजना केल्या जात आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण वंटास मुंबईच्या या लेखातून मधून जाणून घेणार आहोत.
शाळा महाविद्यालये सुरू करण्यासाठी मुख्यतः पाच पद्धती अवलंबल्या जाण्याची शक्यता आहे.
1. दोन वेगवेगळ्या सत्रात शाळा सुरू करणार
● कोरोना संकटाच्या काळात सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे गरजेचे आहे.
● मुख्यतः शाळेत असणाऱ्या एका वर्गातील विद्यार्थी संख्या जास्त असल्यास सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू शकतो.
● त्यामुळे मर्यादित विद्यार्थी संख्या घेऊन दोन सत्रात वर्ग भरविण्याची योजना सरकारने आखली आहे.
● जागेच्या उपलब्धतेनुसार वर्गातील विद्यार्थ्यांची सकाळ व दुपार अशा दोन सत्रात वर्ग भरविले जातील.
2. सम विषम संख्यांचा वापर करून नियोजनाची तयारी
● दोन सत्रात विद्यार्थी विभाजनासाठी सम व विषम संख्याचा वापर केला जाऊ शकतो.
● खरे पाहता, प्रदूषण रोखण्यासाठी सम विषम संख्यांचा फॉर्म्युला साधारण गाड्यांना वापरण्यात येतो.
● आता शाळा महाविद्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.
3. ट्रान्सपोर्टबद्दल मोठा विचार
● कोरोनाचे संक्रमन लक्षात घेऊन अनेक शाळा विद्यार्थ्यांच्या लांब वाहतुकीवर मर्यादा घालण्याचाही सरकार विचार करत आहे.
● स्कुलबसमुळे विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात येण्याची जास्त भीती निर्माण होते.
● याचा विचार करून स्वतः पालकांनी आपल्या मुलाला त्यांच्या जबाबदारीवर शाळेत सोडण्यासाठी सांगितले जाऊ शकते.
● याचा मोठा फटका हा स्कुलबस, वाहन चालकांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार, हे नक्कीच!
4. शालेय आठवडा होणार 6 दिवसांचा
● आतापर्यंत अनेक शाळेंचा आठवडा हा पाच दिवसांचा असे.
● आता तो बदलण्यात येणार असून तो सहा दिवसांचा करण्यात येईल.
● कोरोना संकटाच्या काळात, विद्यार्थ्यांना मिळालेली सुट्टी व त्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
5. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने शिकवणी
● विद्यार्थ्यांची शाळेत होणारी गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने शिक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
● शक्य असणाऱ्या 50 टक्के विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यास सांगितले जाईल.
● तसेच उरलेल्या 50 टक्के विद्यार्थ्यांना शाळेत येऊन शिक्षण घेण्यास सांगितले जाईल.
● या ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीमुळे एकाच वेळी, एक शिक्षक, दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतात.


0 Comments