सन 1920 मध्ये नागपूरात कॉंग्रेसी अधिवेशन भरवण्यात आलं होतं. त्या अधिवेशनात महात्मा गांधींनी भारताची भाषावार प्रांतरचना व्हावी, या मुद्दाला संमती दर्शवली होती. त्याआधी ब्रिटीशांनी आपल्या राज्यकारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती; मात्र काही महात्मा गांधी यांच्यासोबतच काही स्वातंत्रवीरांचं देशाची फाळणी भाषावार व्हावी असं मत होतं. या रजनेला स. का. पाटील, पंडीत जवाहरलाल नेहरू यांचा विरोध होता, तरीही पहिली 1930 मध्ये पटवर्धन यांनी आणि 1940 मध्ये ग. त्र्यं. माडखोलकर यांनी अनेक संम्मेलनांमध्ये मुंबईसह महाराष्ट्र एकिकरणाचा विषय उपस्थित केला होता. २८ नोव्हेंबर १९४९ रोजी आचार्य अत्रे व डॉ. आर. डी. भंडारे यांनी मुंबई महापालिकेत संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडला होता. 

त्यानंतर अनेक गोष्टी महाराष्ट्रासह मुंबईत घडल्या. त्यावेळेस हैद्राबादसाठी एक भाषिकाचं तत्त्व आणि मुंबईसाठी द्वैभाषिकाचं तत्व का आखलं जातय? असे प्रश्नदेखील उभारण्यात आले होते. गुजरातच्या विकासासाठी मुंबई गुजरातमध्ये कर्नाटकसाठी बेळगाव कर्नाटकमध्ये आणि नागपूरचं महत्व कमी होऊ नये म्हणून वेगळा विदर्भ अशी रचनादेखील त्यावेळी आखण्यात आली होती. अखेर अनेक शितयुध्दानंतर महाराष्ट्राला मुंबई हवी असेल तर गुजरातला दहा कोटी द्यायचे आणि भांडवलदारांनी उभे केलेला प्रपंच म्हणून त्या बदल्यात व्याजासकट पन्नास कोटी द्यायचा ठराव मंजूर करण्यात आला. 1960 ते 1970 या काळात भाषावार प्रांतरचना आखण्यात आली आणि मुंबईतील मराठी भाषिक वगळता अनेक परप्रांतिय आपल्या राज्याकडे रवाना झाले. राज्यातील सगळ्यात मोठं पहिलं स्थलांतर म्हणून त्याकडे अनेकजण पाहात असतानाच राज्यात दुसऱ्या स्थलांतराने जन्म घेतला.



मुंबई जरी महाराष्ट्राच्या नावावर असली तरी इथल्या अनेक कामांवर परंप्रांतियांनी आपला जम बसवला. अनेक लोकांनी आपले संसार कायमस्वरुपी इथेच मांडले. अनेकजण आपल्या कुटुंबासोबत इथे आले तर अनेकांनी पैसा कमवण्यासाठी मुंबई गाठली, ते इथलेच स्थाईक झाले.

आज देशात सर्वाधिक कोरोनारुग्णांचा आकडा मुंबई शहरात आहे, कारण इथे असलेली दाटीवाटीची झोपडपट्टी हे कोरोना पसरण्याचं प्रमुख कारण आहे. अशा झोपडपट्टीमध्ये राहाणाऱ्या अनेकांना आता जीवाची काळजी वाटायला लागली आहे. सोबतच मुंबई बंद असल्याने पैसे कमवण्याचे कोणतेच साधन अनेकांकडे नाही. अनेकांना खाण्यापिण्यापासून घरभाडे भरण्यापर्यंतच्या समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. या कारणांमुळे अनेक परप्रांतियांनी गावाकडे चालत जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले. (ही परस्थिती फक्त परप्रांतियांची नाही तर मुंबईतून बाहेर पडणाऱ्या अनेक मराठी भाषिकांचीही आहे.)

अशा राज्या-राज्या अंतर्गत स्थलांतर करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारने श्रमिक ट्रेन सुरू केल्या आणि त्याच्या अंतर्गत अनेक लोकांनी आपल्या राज्याच्या वाटा धरल्या. मुंबईतदेखील तीच परिस्थिती दिसू लागली. ज्याप्रकारे अनेक ट्रेन भरून लोंढेच्या लोंढे महाराष्ट्रात येऊ लागले, त्याप्रकारेच लोंढेच्या लोंढे महाराष्ट्राबाहेर जीव वाचवण्यासाठी दिसू लागले. त्यामुळे फाळणीनंतरचं सगळ्यात मोठं स्थलांतर म्हणून या सगळ्या धावपळीकडे पाहिलं जात आहे.

'हा लेख कसा वाटला' हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, अशाच अनेक पोस्टसाठी आमच्या सोशल मिडीयाशी कनेक्ट राहा, याव्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणत्या विषयाची माहिती हवी असेल, तर त्याबद्दलही कमेंटमधून जरूर कळवा.


हेही वाचाच...