मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र सुरू होणार होतं, अशी चर्चा गेल्या 2007 सालापासून सुरू होती. हे केंद्र उभारण्यासाठी मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्पेक्सच्या जागेची निवड झाली होती, मात्र बीकेसीमध्ये अशी जागा मिळत नसल्याने तो प्रोजेक्ट अजून अडकून पडला आहे, अशी माहिती आहे.
सध्या काय घडलं?
बीकेसीमध्ये उभे राहाणारं हे IFSC म्हणजेच आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरात येथील गांधीनगरमध्ये उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उभारणारं आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र हे आता गुजरातच्या भुमीवर उभारणार आहे, त्यामुळे हा एकप्रकारे महाराष्ट्रावर अन्याय असल्याचे म्हटले जाते.
आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रात काय चालतं?
याच्यात आयएफएससीमधील बँकिंग, भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रांचे अनेक नियामक होत असतात. आरबीआय, सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे नियमन या ठिकाणांहून केले जाते. या आयएफएससी केंद्रातून परदेशातील उद्योगांमध्ये गुंतवणुक करण्यात येणार आहे. ते मुबंईत असल्याने परदेशातील चलन, त्याच्यासंबंधीत असलेला महसुल आणि अनेक आर्थिक घडामोडी मुंबईतून चालल्या असत्या. मात्र आता हे सगळं गुजरातमधून होणार आहे आणि त्यासंदर्भातील महसुल गुजरातच्या तिजोरीत जमा होणार आहे.
IFSC चे सीईओ तपन रे म्हणतात....
तपन रे यांच्या मते गुजरातमध्ये आयएपएससी आल्याने सगळ्या आंतराष्ट्रीय सुविधा एकत्र मिळतील, त्यामुळे देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही भागात गुंतवणुक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्रामुळे सुलभता निर्माण होणार आहे.
IFSC वर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात...
हेही वाचाच...


0 Comments