गेल्या काही दिवसांपासून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनात विद्यापीठ परीक्षा होणार की नाही, या संदर्भात चिंता लागून होती. आता या संपूर्ण चिंतेच निरसन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे, पाहुयात याच संदर्भातील काही महत्वाचे 11 निर्णय...
- तृतीय वर्षाच्या सर्व परीक्षा सोडून प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा रद्द, मागील वर्षीच्या गुणतक्त्यानुसार याहीवर्षी गुण देणार
- अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्राच्या लांब असल्याने महाराष्ट्र शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला आहे, UGC ने आखून दिलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांना गुण मिळणार आहे.
- यावर्षी दिलेल्या गुणांमध्ये विद्यार्थ्यांना कमी वाटत असेल, तर पुढच्या वर्षी विद्यार्थी पुन्हा परीक्षा देऊ शकतात.
- मागील वर्षी जे विद्यार्थी नापास झाले होते, त्या विद्यार्थ्यांनी पुढच्या वर्षी संबंधित पेपर देणे बंधनकारक आहे.
- ज्यांच्या परीक्षा यावर्षी झाल्यात त्याच्यात विद्यार्थ्यांना गुण जास्त असतील तर ते गुण पकडले जातील.
- आता झालेल्या पेपरमध्ये जरी विद्यार्थ्यांना ATKT लागली तरी विध्यापीठ सुरू झालेल्या 120 दिवसांच्या आत त्या पेपरची परीक्षा घेतली जाईल.
- कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर संपला, तर पुन्हा 20 ते 25 जूनमध्ये परत UGC च्या नियमानुसार निर्णयात बदल करण्याची शक्यता आहे.
- अनेक विद्यार्थ्यांच्या CET परीक्षा आहे, त्या तालुका स्तरावर होण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे,त्यासाठी कमिटीचा येत्या 8 दिवसात निर्णय होणार
- SNDT च्या परीक्षा होणार आहेत, त्या परीक्षा परराज्यात असल्याने संबंधित राज्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
- ज्या विध्यार्थ्यांच्या अटेंडन्सचा प्रॉब्लेम होता, त्या विद्यार्थ्यांची लॉकडाऊन दरम्यानची 45 दिवसांची संपूर्ण हजेरी दाखवण्यात येणार आहे, याच्यातून देखील विद्यार्थ्यांची हजेरी भरत नसेल तर युनिव्हर्सिटीने त्या विद्यार्थ्यांचा विचार करावा.
- चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठांना अधीकार देण्यात आलेत, ते निर्णय घेऊन तिथल्या महत्वाच्या परीक्षा घेऊ शकतात.
- या सगळ्यात, विद्यार्थ्यांना काही समजत नसेल तर कुलगुरू सचिव आणि विद्यापीठाने विद्यार्थ्यांना समजून दिलं पाहिजे, ताशाप्रकारे सेल लावले जातील आणि विद्यार्थ्यांना माहिती दिली जाईल.


3 Comments
Backlog sathi khi karayla havv hota...😔
ReplyDeleteबॅकलॉग असलेल्यांना पुढच्या वर्षात जाता येणार, मात्र विद्यापिठे सुरू झाली की त्यांनी पेपर देणे गरजेचे असेल...
DeleteStd 5th student chi pan Re- exam ghet aahet schools ( English, marathi ,maths ) ya subject chi mala msg aala aahe school kadhoon ...
ReplyDelete(Mast Shaikh Aamir T.
has to attend re-exam as his progress is not satisfactory. Details about re- exam will be informed later.) 14 may 15may 16may dates diley aahe ya baddal kahi updets.....