देशात, राज्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार होऊ लागला आणि आतापर्यंतच्या काळात जे कधीच घडलं नव्हतं, ते सगळं होऊ लागलं. लॉकडाऊनच्या काळात काही सण येऊन गेले, त्या सणांच्या सेलिब्रेशनमध्ये देखील कोरोनाने विरजण घातलेले गेले. यामध्ये गुडीपाढवा, रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, ईस्टर संडे, गुड फ्रायडे या सगळ्या सणांवर कोरोनामुळे पाणी फेराव लागलं.

या सगळ्या सणांमध्ये मुस्लिम बांधवांचा श्रद्धेचा सण समजल्या जाणाऱ्या रमजानवरदेखील कोरोनाच सावट दिसून येत आहे. रमजानचा संपूर्ण महिना रोजा पकडून साजरा केला जातो, मोठ्या उत्साहाने महिन्याच्या शेवटी ईद साजरी केली जाते. मुस्लिम धर्मात रमजानचा महिना पवित्र मानला जातो. महाराष्ट्रात इस्लाम धर्मियांची संख्या ही 11.54 टक्के आहे. यावर्षी 24 एप्रिलला रमजान महिना सुरू होईल; पण सौदी अरबेयातील मुस्लिम धर्माची जी धर्म परिषद आहे, त्यांनी जगभरातल्या मुस्लिम बांधवांना आवाहन केलंय की तुम्ही मशीदमध्ये येऊन नमाज पठण करण्यापेक्षा आपापल्या घरात राहुन नमाज पठण करा. सर्वत्कृष्ट मानली जाणारी मक्केतील मशीदसुद्धा बंद आहे, यावरून या विषाणूची व्याप्ती समजून घ्या. या सर्व घटना घडत असताना भारतातल्या मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी व मुस्लिम धर्मगुरू एकत्र येऊन भारतातील मुस्लिम समाजासाठी रमजान काळात काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. या सूचना रमजानच्या काळात पाळाव्या असेही आव्हान केलं जातय.

काय आहेत सूचना?
रमजानच्या काळात मशिदीत न जाता घरातच नमाज पठण करावे.

लॉकडाउनच्या काळात मशिदीमधून लाऊडस्पीकरवरून दिली जाणारी अजाण बंद ठेवावी.

रमजानच्या काळात बाहेर पडू नये. 

मशिदींमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करू नये.

रोजा सोडल्यांनंतर प्रार्थना घरातच करावी त्यासाठी मशिदीत जाऊ नये. 

मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीचे कुलगुरू फिरोज बक्त यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती केली आहे की, 24 मे पर्यंत लॉकडाउन वाढवावे. ज्यामुळे रमजानचा संपूर्ण महिना लॉकडाउनमध्ये जाईल आणि हे नियम पाळणे सोयीस्कर होईल.