लॉकडाऊन वाढणार की नाही याबद्दल काहीच माहिती नाही, मात्र सध्या 21+21 अशा लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांची आणि तिथे काम करणाऱ्या अनेक तरुणांची काय हालत होत असेल, हे सांगण नवीन नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित करताना; ना कंपन्यांना अल्टिमेट टाईम दिलाय, ना कर्मचाऱ्यांना. त्यामुळे पैशांच्या बाबतीत विचार केल्यास कदाचित कोणाचीच, कसलीच तयारी झालेली नव्हती किंवा नाही.

आता काही शास्त्रज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की कोरोनाची लागण ही फक्त 60 वर्षांहून अधीक वय असलेल्या काहींना होते, त्यातही परदेशी दौरे, शस्त्रक्रिया, आजारपण, कॅन्सरवरती उपचार सुरू असणारे, प्रतिकार क्षमता कमी असलेले, अशा अनेकांना याची लागण होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशांनी घरामध्ये बसून राहणं, वेळेवर उपचार घेणे किंवा काही संशय वाटल्यास लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

लॉकडाऊनमुळे कार्पोरेट भागात काय प्रश्न निर्माण होत आहेत?
  • लॉकडाऊन वाढला तर कंपन्यांना मोठ्या आर्थिक संकटातून जावं लागणार आहे?
  • अशा आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी खाजगी किंवा शासकीय कंपन्यांनी काही नियोजन केलं आहे का?
  • अशात मग धडधाकट तरुणांना कामावर बोलवलं तर काय होईल?
  • कामावर येणाऱ्यांना काही दिवस घरी जाऊ न देता ऑफिसमध्येच राहायची सोय केली तर?
  • कामावर येणाऱ्या अनेकांना चुकामुकीमुळे कोरोनाची लागण झाली तर?
  • संपुर्ण कामगारांना डॉक्टरांप्रमाणे काहीसा PPE कीट सारखाच ड्रेस दिला तर?
  • सगळ्यांनीच घरून काम केलं तर?
  • पण अनेकांच्या घरात नेटवर्क किंवा साहित्याचा अभाव असतो, त्याच काय?
  • आणि अशे अनेक प्रश्न आहेत, जे सामान्यस्तरावर डोकं खात असतात...
तरुणांनी काय करावं?
वर उल्लेख केल्याप्रमाणे ज्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे किंवा संशय आहे, अशांना घरात ठेवून जे ठणठणीत बरे आहेत, त्यांनाच जर काम करण्याची संधी दिली तर काय होईल, असा अंदाज काही शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. एडिनबरा विद्यापीठाचे प्राध्यापक मार्क वुलहाऊस यांचं म्हणनं या सगळ्या परिस्थितीवर काहीसं वेगळं आहे.

मार्क वुलहाऊस म्हमतात...
देशात आणि जगात कोरोनाची लागण झालेल्या 80 टक्क्यांहून अधिक जणांना कोरोनाचा त्रास होऊ शकतो, पण यामुळे त्यांचा जीव जाईल, असं वाटत नाही. याच्यातच कामावर जाणाऱ्यांना जर कोरोनाची लागण झाली तर त्याचा आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होणार नाही, मात्र दुसरीकडे त्यांच्याच घरात असणाऱ्या किंवा संपर्कात येणाऱ्या बाकीच्या लोकांनी मोठी खबरदारी पाळावी, वेगळी रूम, बाथरूम वेगळे किंवा त्या कर्मचाऱ्यांनी बॅचरल राहिलेलं उत्तम. हे सगळे कामकाज सुरू असताना वर नमुद केलेल्या लक्षणांपैकी एक जरी लक्षण असेल, अशांनी पुढचे 12 हून अधिक आठवडे तरी घरातून बाहेर पडू नये.

मुंबईत हे शक्य आहे का?
मुंबईतल्या अनेक कंपन्यांमध्ये काम करणारा कर्मचारी हा सहसा किंवा जास्तकरून मुंबईतल्या झोपडपट्टीतून येत असतो. त्याच्यातच मुंबईतल्या झोपडपट्टीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. घरातून बाहेर पडलेल्या सगळ्यांनाच कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिथुन येणारा कामगार वर्ग बाहेरच्या दुनियेत सगळ्यांच्या संपर्कात येऊ शकतो, त्यातच तिथून येणाऱ्या अनेक तरुणांची ऑफिसमध्ये राहाण्याची सोय करणे, हे सगळ्याच ऑफिसेसला या दिवसांमध्ये परवडणारी गोष्ट नाही, त्यामुळे मुंबईतील अनेक बड्या उद्योग समुहांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करणे सोईस्कर असेल, नाहीतर मुंबईच्या गल्लीत परसणारा हा कोरोना कार्पोरेशनमध्ये असलेल्या व्यवस्थेला खिळखिळा करून सोडेल.
हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये जरुर कळवा आणि मुंबईबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास त्याबद्दलही सांगा, आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू.