"भारतामध्ये सगळ्यात जुने विद्यापीठ कोणते?" असा प्रश्न जर कोणी केला तर कलकत्ता, मद्रास आणि मुंबई विद्यापीठ अशी नावं समोर येतात. त्याच्यातच सगळ्यात जास्त चर्चा मुंबई विद्यापीठाची होते. मग त्याच्यासाठी अनेक कारणे असतील. असो, आपण चर्चांना थोडं बाजूला ठेवून, चांगलं काही तरी बोलू.

इंग्रजांचा काळ हा १८०० सालापासून होता. त्यामुळे आपल्या मुलांना शिक्षण मिळावं आणि भारतातल्या काही गोऱ्या लोकांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी डॉ. जॉन विल्सन नावाच्या अधिकाऱ्याने यात पुढाकार घेऊन १८५७ साली युनिव्हर्सिटी ऑफ बाँम्बेची (सुरूवातीचे नाव) स्थापना केली. त्यासाठी सर चार्ल्स वुडच्या इ.स. १८५४ च्या शिक्षणविषयक खलित्याचा आधार घेलता होता, असे काहींचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डॉ. विल्सन यांच्या पत्नी डॉ. मार्गरेट बन विल्सन यांनी मुंबईत सेंट कोलंबाज, इतर १५ शाळा आणि विल्सन महाविद्यालयाची स्थापना केली.

त्या नंतर बॉम्बे विद्यापीठाचा विस्तार होण्यास सुरूवात झाली. सध्य स्थितीत मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली अनेक महाविद्यालये आहेत. त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, कोकण, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विद्यालयांचा समावेश आहेच. सोबतच जिल्ह्यांतील बहुतेक सार्वजनिक महाविद्यालयेदेखील मुंबई विद्यापीठाच्या अख्तारिखाली असल्याची माहिती आहे. मुंबई विद्यापीठाचा जास्तकरून अभ्यास हा इंग्रजीमधून चालतो, त्यामुळे अभियांत्रीकी तसेच इतर शिक्षण देणाऱ्या खासगी संस्थाही मुंबई विद्यापीठाशी सलग्न झाल्या आहेत. (मुंबई विद्यापीठाचे स्वतःचे अभियांत्रिकी व वैद्यकिय विभाग नाही.)

मुंबईच्या सांताक्रूझ (इस्ट) परिसरातील तब्बल २३० एकरमध्ये मुंबई विध्यापीठ वसलं आहे. यात विद्यापीठाचे शैक्षणिक व प्रशासकीय कामकाज चालते. तर मुंबईच्या फोर्ट परिसरात असलेल्या विद्यापीठ संकूलात फक्त प्रशासकिय कारभार चालतो. सन १९५३ च्या दरम्यान बाँम्बे युनिवर्सिटी ॲक्टनुसार विद्यापीठाचे अधिकार आणि कामकाजाची नियमावली ठरवण्यात आली होती, जी आजतागायत कायम आहे.

सन १९९६ रोजी बॉम्बेचे मुंबई असे नामकरण केले आणि मुंबईच्या अनेक भागांसह अनेक संस्थाचे नामकरण करण्यात आले होते. ज्यात विद्यापीठाचादेखील समावेश होता. त्यामुळे युनिव्हर्सिटी ऑफ बाँम्बेचे (बाँम्बे विद्यापीठ) मुंबई विद्यापीठ करण्यात आले. १९९६ च्या ४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाने नामांतराच्या अनेक मुद्यांना घेऊन सादर केलेल्या राजपत्रानुसार अधिकृतरित्या बॉम्बेचे मुंबई विद्यापीठ म्हणून घोषीत केले.

सन २०१० साली झालेल्या नॅक (राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद) कडून झालेल्या मुल्यमापनामध्ये मुंबई विद्यापीठाला पंचतारांकित दर्जा प्राप्त झालाय, तर २०१२ साली सादर केलेल्या जगातील सर्वोत्तम विद्यापीठांच्या यादीत या महाविद्यालयाचा ५५१ वा नंबर आहे. त्यामुळे अनेक बऱ्या-वाईट चर्चांनी जरी मुंबई विद्यापीठ चर्चेत असले, तरी मुंबई विद्यापीठाची अनेक कर्तबगारी जगात भारी आहे, हे नक्की.

हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि असे अनेक मुंबईबद्दलचे वंटास किस्से वाचायचे असीतल, तर आम्हाला नक्की फॉलो करा.