मुंबईत गेल्या काही दिवसांपासून  रुग्णांची संख्या वाढत चालल्याने  अनेक परिसर सील करणे, ज्या इमारतीत, चाळीत किंवा गल्लीमध्ये रुग्ण सापडतात ती इमारत किंवा संपूर्ण चाळ सील करणे असा सिलसिला सुरू करण्यात आलाय. संपूर्ण परिसर शांत करण्यासाठी त्याला हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आलं. त्यातच अजून रुग्ण वाढले आणि कंटेंनमेंट झोनचा प्रकार सुरू झाला. आता  झालंय असं की 5 हून अधिक रुग्ण जर एकाच परिसरातुन समोर येत असतील तर त्याला कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित केलं जातं.

कंटेंनमेंट झोन म्हणजे काय?
कंटेंनमेंट झोन म्हणजे एकाच ठिकाणी पाचहून अधिक रुग्ण आढळले तर तिथल्या तीन किलोमीटरच्या परिसराला सील केलं जातं. त्यानंतर त्या परिसरात राहणाऱ्या सर्वांची, सर्व रहिवाश्यांची घरोघरी जाऊन (डोअर टू डोअर टेस्टिंग) चाचणी केली जातेय. पहिल्या आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात कोण आलं असेल तर, त्यांना विलगिकरण कक्षात ठेवले जातेय, लॉकडाउनला घेऊन संपूर्ण परिसरात अटी आणि नियम कडक केले जातात. 

मुंबईतल्या कंटेंनमेंट झोनची अवस्था...
मुंबई सोडून राज्यात जी आकडेवारी आहे तेवढीच आकडेवारी एकट्या मुंबईत आहे, त्यामुळे मुंबई महानगरपालिकेसोबतच महाराष्ट्र राज्य प्रशासनदेखील याकडे जास्त लक्ष देत आहेत. मुंबईतील रुग्णांच्या संख्येने तीन हजारांचा आकडा कधीच पार केलाय, त्यामुळे राज्यासह देशाचं लक्ष मुंबईकडे आहे. मुंबईत सध्या 721 कंटेंनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत, त्यातील सर्वात जास्त म्हणजे जीएस वॉर्डमध्ये आहेत. जीएस वॉर्डमध्ये वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, करीरोड, लोअर परेल, प्रभादेवी या ठिकाणांचा समावेश येतो.

अनकंटेंनमेंट झोन करण्याची वेळ का अली?
मुंबईत सगळ्यात आधी रुग्णांची संख्या ही जीएस वॉर्डमधून जास्त येत होती, आताही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे इथले परिसर सील करण्यास खूप दिवसांपूर्वीपासूनच सुरुवात झाली होती. मात्र आता त्यातील काही ठिकाणांना मोकळं करण्यात येत आहे, याचं कारण म्हणजे इथे गेल्या 14 दिवसांपासून एकही रुग्ण आढळला नाही. इथे कडकरित्या सोशल डिस्टनसिंग पाळल्यामुळे कोरोनाचे संक्रमण झालं नाही. डोअर टू डोअर जाऊन तपासणी केल्याने ज्यांना कोरोनाचे संक्रमण झाले होते, त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे तिथे कोरोनाची साखळी तुटली गेली आणि परिणामी तिथले कोरोनाचे नवीन रुग्ण समोर आले नाहीत.

हे 9 कंटेंनमेंट झोन कोणते?
हे 9 कंटेंनमेंट झोन वरळी आणि प्रभादेवी या परिसरातील आहेत. आदर्श नगर, सिद्धीप्रभा इमारत, वरळी पोलीस कॅम्प, सती आसरा, उत्कर्ष बुल्डिंग, जोशी मार्ग येथील बीडीडी चाल, आनंदछाया बुल्डिंग आणि आहुजा इमारत या इमारत आणि परिसरांचा समावेश आहे...