कोरोनाला शिकार होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एवढ्या मोठ्या मुंबईत कदाचित सरकारने आधीपासून आरोग्यसेवेकडे चांगल्याप्रकारे लक्ष दिले नसल्यामुळे आता जसे रुग्ण वाढत आहेत, तशी अनेक गोष्टींची टंचाई भासत आहे. आता नव्याने सगळ्या यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोना रुग्णांचा उपचार आणि वाढत संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना टेस्टिंग वाढविण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच आकडेवारीत वाढ होत आहे. हे सगळं आधी सुरु व्हायला हवं होतं पण चलो, देर आये दुरुस्त.
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या उपचाराकरिता कस्तुरबा परिसरात तीन मजली नवी प्री इंजिनिअर्ड बिल्डींग उभारण्यात येणार आहे. आपण बातम्यांद्वारे चीन नेही असा एक रुग्णांच्या उपचारासाठी केलेला पराक्रम ऐकला असावा. तशाच चीनच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईतही उभारली जाऊ शकते, कोरोना उपचारिक बिल्डींगवजा दवाखाना, हेच आपण आजच्या वंटास भागात पाहाणार आहोत.
पहिला चीनची भानगड काय आहे चे पाहूया...
कोरोनाचे उगमस्थान म्हणजे चीन आहे, ह्याच चीनमधील वुहानमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी अवघ्या दहा दिवसात खास रुग्णालये उभारण्यात आली असल्याची माहिती देणाऱ्या अनेक बातम्या काही दिवसांपुर्वी आपण वाचल्या असतीलच. यामध्ये खास दोन रुग्णालयाची क्षमता 1 हजार बेडची आहे. त्याशिवाय विलगिकरणासाठीही 14 तात्पुरती आरोग्य केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या खास रुग्णालयात उपचारासाठी योग्य त्या सोई सुविधा उपलब्ध आहेत, असं बातम्या सांगतात.
आता मुंबईतील प्री इंजिनिअरिंग बिल्डींग काय प्रकार आहे ते पाहू...
नुकतीच एक खबर समोर येत आहे, ती म्हणजे मुंबईतील कोरोना रुग्णांवरील उपचारात महत्वाचे मानले जाणारे कस्तुरबा रुग्णालयाजवळ प्री इंजिनिअरिंग बिल्डींग उभारण्यात येणार आहे. या अत्याधुनिक पद्धतीने कस्तुरबा रुग्णालय परिसरात नवीन तीन मजली इमारत उभारण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे कस्तुरबा परिसरातील नवी तीन मजली बिल्डींग प्री इंजिनिअर्ड असणार, असंही म्हटले जात आहे.
मुळात, प्री इंजिनिअर्ड बिल्डींग या कारखान्यात तयार होतात आणि त्याची जुळणी केवळ जागेवर करण्यता येते. त्यामुळे या बिल्डींगचे अनेक भाग कारखान्यात तयार करण्यात येणार असल्यामुळे आपला वेळ वाचून सर्व काम तीन महिन्यात पूर्ण होईल, अशी अपेक्षा असल्याचे समजते. अगदीच, याची कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा वैगरे झाली नाही; पण असं करण्यात यावं असं अनेक तज्ञांचं मत आहे.
कसे होईल प्री इंजिनिअर्ड बिल्डींगचे काम
सध्याच्या परिस्थितीत कस्तुरबा रुग्णालयात विलगिकरणासाठी साठ बेड्स आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येनुसार कस्तुरबा रुग्णालय परिसरात नवी इमारत उभारण्याबाबत येत्या काही दिवसात निर्णय अपेक्षित आहेत. त्यानुसार इमारतीचा आराखडा निश्चित होण्याची शक्यता आहे. या नव्या इमारतीत 47 बेड्स वॉर्डमध्ये असतील. त्याशिवाय अतिदक्षता विभागात 6 आणि अन्य 7 बेड्स असतील. तसेच इमारत बनविण्यासाठी मंजूरी मिळाल्यास मुंबई महापालिका प्रथमच रुग्णालय उभारणीसाठी प्री इंजिनिअर्ड पद्धतीचा अवलंब करू शकते. त्याची उभारणी करताना पाया पारंपारीक पद्धतीनेच बांधण्यात येऊ शकतो व इतरत्र सर्व काम फॅक्टरीत होईल. ही इमारत प्रामुख्याने स्टेनलेस स्टीलची असण्याची शक्यता आहे. मेट्रो स्थानक, वेअरहाऊसच्या बांधकामासाठी वापरली जाणारी ही प्री इंजिनिअर्ड पद्धत प्रथमच अशाप्रकारासाठी वापरण्यात येणार आहे.
काय फायदा होईल प्री इंजिनिअर्ड बिल्डींगचा
वाढत्या आकडेवारीनुसार रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशी जागा मिळेल. विलीगिकरण करण्यासाठी ह्या प्री इंजिनिअर्ड बिल्डींगचा चांगला उपयोग होऊ शकतो. मुख्य म्हणजे इतर आजारांच्या रुग्णांना कोरोनाग्रस्त रुग्णांपासून दूर ठेवता येईल. भविष्यात मुंबई महापालिका हा बिल्डींगचा उपयोग अनेक कामांसाठी करू शकते.
हेही वाचा...


0 Comments