मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं तर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. हे सगळं असताना त्या पालिकेच्या नावासोबत एका व्यक्तीचे नाव घेतले जाते, ज्यांनी या पालिकेची सुरूवात केली आणि मुंबईच्या कारभाराला साचेबंद करण्याचं काम केलं होतं.
बृहन्मुंबई महानगरपालिकेची (Municipal Corporation of Greater Mumbai) 1865 साली सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला या नगरपालिकेचे आयुक्त आर्थर क्रॉफर्ड (Arthur Crawford) हे इथले पहिले नगरपालिका आयुक्त होते. गिरगाव रोडच्या टर्मिनस येथे सुरुवातीला एका साध्या इमारतीत पालिकेची सुरुवात करण्यात आली, त्यानंतर 1870 साली वॅटसन हॉटेल व ससून मेकॅनिक्स संस्थेच्या मध्यभागी असलेल्या एस्प्लानेड इमारतीत महापालिकेचा संपुर्ण कारभार हालवण्यात आला होता, जिथे आता सैन्य व नेव्हीची इमारत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे पहिले नगरपालिका आयुक्त म्हणून आर्थर ट्रॅव्हर्स क्रॉफर्ड [Arthur Travers Crawford (1835–1911)] यांनी कारभार पाहाण्यास सुरूवात केली. क्रॉफर्ड हे सक्षम प्रशासक, आर्थिक व्यवहारांमध्ये तरबेज तसेच सिव्हील सर्वंट म्हणून ओळख असणारे अधिकारी होते. त्यांनी सन 1895 ते 1871 या कालावधीत मुंबई महानगरपालिकेचा कारभार सांभाळला.
जेव्हा आर्थर क्रॉफर्ड यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली, तेव्हा मुंबईमध्ये (त्यावेळेचे बॉम्बे) पाणीपुरवठा कमी होता, अनेक ठिकाणी कचरा साचला होता आणि त्यावेळेस मृत्यू दर 1000 मध्ये 40 होता. क्रॉफर्डने पुढील दोन वर्षांत मुंबईतील सर्व रस्ते स्वच्छ केले. मुंबईतील साचलेले पाणी समुद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी नाले निश्चित केले आजही मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी न साचण्याचं कारण कॉफर्ड असल्याचे म्हटले जाते.
काही वर्षांनी (1870-71च्या काळात) मुंबईमध्ये सुरू असलेली कामं, त्यांचं आर्थिक धोरण, आर्थिक गैरव्यवहार अशा अनेक मुद्दांना घेऊन कॉफर्ड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यावेळी वकील फिरोजशाह मेहता यांनी त्यांचा बचाव केला. याचवेळी क्रॉफर्ड यांच्यावर असाही आरोप करण्यात आला की त्यांनी एका तहसिलदाराकडून लाच घेतली आहे, त्यामुळे कॉफर्ड अनखी वादाच्या भोवऱ्यात अडकले.
या मुद्दांना घेऊन लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले यांनी अनेक सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या भाषणांमधून कॉफर्ड यांच्यावर आरोप करणे सुरू केले. या सगळ्यावर उपाय म्हणून कलकत्ता हायकोर्टाचे न्यायाधीश आर्थर विल्सन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. त्या समितीने दाखल केलेल्या अहवाला नुसार क्रॉफर्ड हे लाच स्वीकारण्याच्या आरोपात दोषी नसून केवळ अधिकृत अधीसंस्थांकडून पैसे घेतल्याबद्दल दोषी आढळले, त्यामुळे क्रॉफर्ड यांचे सिव्हिल सर्व्हिसेसच्या यादीतून नाव काढून टाकले आणि त्यांना लंडनला परत जाण्यास सांगितले.
गोपाळ कृष्ण गोखले पुस्तकाचे लेखक गोविंद तळवलकर यांनी लिहलेल्या 'हिज लाइफ अँड टाइम्स' च्या वेस्टमिंस्टर पुनरावलोकनात क्रॉफर्ड यांच्यावर असा आरोप करण्यात आला आहे की क्रॉफर्ड यांचा बेकायदेशीर निधी एका फ्रेंच बँकेमार्फत युरोपमध्ये पाठवला जात असे.
सध्या दक्षिण मुंबईत स्थित असलेल्या क्रॉफर्ड मार्केटला आर्थर ट्रॅव्हर्स क्रॉफर्ड यांचे नाव देण्यात आले आहे.1905:Crawford Market,#Mumbai.— Mumbai Heritage (@mumbaiheritage) April 10, 2014
It is named after Arthur Crawford,first Municipal Commissioner and collector of Bombay pic.twitter.com/lIAgsPxwnf







0 Comments